अल्पवयीन दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 09:34 PM2019-06-14T21:34:38+5:302019-06-14T21:35:31+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चोरीची दुचाकी जप्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चोरीची दुचाकी जप्त केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, सेलू येथील विलास भाऊदास डोंगरे हे एम.एच. ३२ झेड. १८७५ क्रमांकाच्या दुचाकीने आठवडी बाजारात गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेल्याची तक्रार विलास डोंगरे यांनी सेलू पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतल्यानंतर सेलू व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. दरम्यान खात्रिदायक माहितीच्या आधारे या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय त्यांच्याकडून चोरीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोहवा निरंजन वरभे, रितेश शर्मा, राकेश आष्टनकर, संघसेन कांबळे यांनी केली.
गस्त वाढविण्याची मागणी
परिसरात सध्या भुरट्या चोरट्यांचा वावर वाढला आहे. शेतात ठेऊन असलेले सिंचनाचे साहित्य लंपास केल्या जात असल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने गस्त वाढविण्याची मागणी आहे.