दोन ट्रकच्या धडकेत मिनीडोअरचा चुराडा

By admin | Published: March 27, 2017 01:06 AM2017-03-27T01:06:42+5:302017-03-27T01:06:42+5:30

पुलगाव-देवळी मार्गावरील अपघातग्रस्त वळणावर दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक झाली.

Minor crush on two truck shocks | दोन ट्रकच्या धडकेत मिनीडोअरचा चुराडा

दोन ट्रकच्या धडकेत मिनीडोअरचा चुराडा

Next

एकाचा मृत्यू : एक गंभीर
पुलगाव : पुलगाव-देवळी मार्गावरील अपघातग्रस्त वळणावर दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक झाली. या धडकेत एक मिनीडोअर मध्ये अडकल्याने त्याचा पुरता चुराडा झाला. या भीषण अपघातात मिनीडोअर चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेल्या अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली.
अंबादास अरुण कनकर (२६) असे मृतकाचे तर सुभाष फकीरचंद मुंधरे (३०) असे जखमीचे नाव असून दोघही वाशिम जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात मिनीडोअरचा चुराडा झाल्याने त्याला उचलण्याकरिता क्रेनचा वापर करावा लागला.

मिनीट्रकमधील मासोळ्या रस्त्यावर
पुलगाव : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरा-समोरा आलेल्या दोन ट्रकमध्ये जबर धडक झाली. या अपघातात मासे घेवून वाशिमकडून नागपूरकडे जाणाऱ्या मिनीडोअर एम.एच.३७ जे. १६८७ क्रमांकाच्या मिनीडोअरचा चुराडा झाला.
एम.एच.०६ ए.जी. १६२७ क्रमांकाचा ट्रक लोहा घेवून तर एम.एच. ३६ एफ. ५००१ क्रमांकाचा ट्रक धान्याची पोती घेवून जात होता. या अपघातात दुर्घटनाग्रस्त झालेल्या मिनीडोअरचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या मिनीडोअरला क्रेनच्या सहाय्याने उचलून रस्त्याच्या बाजूला करावे लागले. या अपघातात अंबादास अरूण कनकर (२६) रा. गौदेश्वर जि. वाशिम याचा मृत्यू झाला तर सुभाष फकीरचंद मुंधरे (३०) रा. गौळीपूरा वाशिम हा जखमी झाला. जखमीला परिसरातील नागरिकांच्या मदतीने सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात होताच दोन्ही ट्रकच्या चालकांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतले आहे. घटनेदरम्यान रस्त्यावर मिनीडोअरमधील माशांचा सडा पडला होता. यामुळे बराच वेळपर्यंत वाहतूक खोळंबली होती.(तालुका प्रतिनिधी)

गतिरोधक आहे, पण पांढरे पट्टे नाहीत
नागपूर औरंगाबाद या द्रुतगती मार्गावर देवळी वळणावर दोन ठिकाणी उंच असे गतिरोधक बसविण्यात आहे. परंतु, सीएडी कॅम्पपासून या वळणापर्यंत कुठेही गतिरोधकाला पिवळे किंवा पांढरे मार्किंग तसेच झेब्रा क्रॉसींगही नसल्यामुळे गतिरोधक सहज दिसत नाही. त्यामुळे बऱ्याचदा वाहन अनियंत्रीत होते. याच वळणावर यापूर्वीही असे अनेक अपघात झाले. या अपघाताने पुन्हा एकदा रस्ता सुरक्षा पथकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Minor crush on two truck shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.