... तुमचं आमचं सेम 'नसतं'; प्रेमाच्या त्रिकोणातून अल्पवयीन मुलींची ‘ताईगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 04:29 PM2022-02-01T16:29:50+5:302022-02-01T18:47:29+5:30

एका अल्पवयीन मुलीने तिच्या कथित ‘बॉयफ्रेंड’च्या मदतीने एका १५ वर्षीय मुलीला चांगलेच बदडले असून तिच्यावर सावंगी येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

minor girl brutally beat another girl over love triangle | ... तुमचं आमचं सेम 'नसतं'; प्रेमाच्या त्रिकोणातून अल्पवयीन मुलींची ‘ताईगिरी’

... तुमचं आमचं सेम 'नसतं'; प्रेमाच्या त्रिकोणातून अल्पवयीन मुलींची ‘ताईगिरी’

Next
ठळक मुद्देकथित प्रियकाराशी मिळून मारहाण मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

वर्धा : प्रेम हे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं... या म्हणीप्रमाणे सध्या तरुण पिढीवर प्रेमाचे आकर्षण आहे. मात्र, प्रेमाचा केव्हा ‘गेम’ होतो. हे समजतच नाही. अशीच घटना शहरातील आयटीआय टेकडीवर सोमवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली. अल्पवयीन मुलीने तिच्या कथित ‘बॉयफ्रेंड’च्या मदतीने एका १५ वर्षीय मुलीला चांगलेच बदडले असून तिच्यावर सावंगी येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

१५ वर्षीय मुलगी ही शिकवणीमध्ये बसून असताना १६ वर्षीय मुलीच्या कथित ‘बॉयफ्रेंड’चा फोन आला आणि शिवीगाळ करून धमकी देऊ लागला. तू मला कसा काय मेसेज केला, असे म्हणत तिला आयटीआय टेकडी परिसरात बोलाविले. अल्पवयीन मुलगी भीतीपोटी तेथे गेली असता तिला दुसऱ्या मुलीने शिवीगाळ करीत माझ्या ‘बॉयफ्रेंड’ला मेसेज का केले, असे म्हणू लागली. मुलीने ते फेक अकाउंट असून मी मेसेज केले नसल्याचे वारंवार सांगूनही त्या मुलीने व तिच्या कथित प्रियकराने त्या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपस्थित तिच्या मित्र-मैत्रिणींनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला; पण तरीही ती मुलगी ऐकत नव्हती. अखेर त्या मुलीला सावंगी येथील अतिदक्षता विभागात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

‘बादल’ने दिली भावाला धमकी

बादल नामक युवकाने सोमवारी जखमी मुलीच्या भावाला मोबाइलवर फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुलीच्या भावाने हा प्रकार बहिणीला विचारला असता ही बाब पुढे आली. दरम्यान बादलने टेकडी परिसरात येण्यासाठी आग्रह धरला होता.

‘फेक’ अकाउंटमुळे घडला प्रकार

१५ वर्षीय मुलीचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून तिचा फोटो वापरून कुणी तरी फेक अकाउंट तयार केले होते. त्या अकाउंटच्या माध्यमातून १६ वर्षीय मुलीच्या कथित प्रियकराला मेसेज पाठविण्यात आले होते. मात्र, मेसेज पाठविणारी मुलगी ती नसल्याने तिने दुसऱ्या मुलीला समजाविण्याचा प्रयत्न केला; पण संतापलेल्या मुलीने १५ वर्षीय मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले.

रामनगर पोलिसांत तक्रार दाखल

घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांना मिळताच त्यांनी तत्काळ रामगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. मध्यरात्री १.२० वाजता जखमी मुलीचे बयाण नोंदविण्यात आले असून पोलिसांनी सकाळी घटनास्थळाची पाहणी केल्याची माहिती आहे.

Web Title: minor girl brutally beat another girl over love triangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.