विवाह न करताच आरोपी 'प्रिया' राहायची ‘मारुती’सोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 10:48 AM2021-12-28T10:48:35+5:302021-12-28T11:01:53+5:30

पत्नीने आपल्या पतीला गावातील एका अल्पवयीन मुलीवर बळजबरी बलात्कार करावयास लावल्या प्रकरणातील आरोपी प्रिया मारबदे ही विवाह न करताच मारुती मारबदे याच्यासोबत मागील काही वर्षांपासून राहत होती, पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे.

minor girl rape case arvi wardha accused Priya living with Maruti without getting married | विवाह न करताच आरोपी 'प्रिया' राहायची ‘मारुती’सोबत

विवाह न करताच आरोपी 'प्रिया' राहायची ‘मारुती’सोबत

Next
ठळक मुद्देअल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

वर्धा : विकृत मानसिकतेच्या पत्नीने आपल्या पतीला गावातील एका अल्पवयीन मुलीवर बळजबरी बलात्कार करावयास लावल्या प्रकरणातील आरोपी प्रिया मारबदे ही विवाह न करताच मारुती मारबदे याच्यासोबत मागील काही वर्षांपासून राहत होती, असे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. दरम्यान, आरोपी मारुती मारबदे तसेच प्रिया मारबदे या दोघांना सोमवारी आर्वी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

आर्वी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद घेत आरोपी मारुती मारबदे तसेच प्रिया मारबदे दोन्ही रा. (मोटोडा) बेनोडा, यांना अटक करण्यात आली आहे. पीडिता घरी एकटी हजर असताना आरोपी प्रिया हिने तिला घरी बोलावले. पीडित मुलगी आरोपीच्या घरी येताच आरोपी प्रिया हिने तिला तू मारुती याच्यासोबत लग्न कर, असे म्हणत दरवाजा बंद करून घराबाहेर पडली. दरम्यान, आरोपी मारुती याने पीडितेवर बलात्कार केला. काही वेळानंतर आरोपी प्रिया ही घरी परतल्यावर तिने मारुती याला पीडितेवर तिच्या डोळ्यासमोरच बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करावयास लावले. शिवाय या घटनेची वाच्यता कुठे केल्यास ठार करण्याची धमकी दिली. हे धक्कादायक प्रकरण तक्रारीनंतर उजेडात आल्यावर पोलिसांनी हालचालींना वेग देत आरोपींना ताब्यात घेत अटक केली.

आरोपी प्रियाला दोन अपत्य

आरोपी प्रिया हिचा काही वर्षांपूर्वी नांदपूर येथील एका व्यक्तीशी विवाह झाला. तिला दोन अपत्य असून काही कारणावरून ती तिच्या पतीला सोडून थेट मारुतीकडे आली. तेव्हापासून ती मारुती सोबतच राहत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी ज्योत्स्ना गिरी करीत आहेत.

बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पीसीआर ठोठावला आहे. प्रिया ही विवाह न करताच आरोपी मारुती सोबत राहत होती असे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. चौकशी सुरू आहे.

भानुदास पिदूरकर, ठाणेदार, आर्वी.

* संबंधित बातमी : धक्कादायक! पत्नीने पतीलाच करायला लावला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Web Title: minor girl rape case arvi wardha accused Priya living with Maruti without getting married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.