अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण : प्रियाच्या संशयी वृत्तीने गाठला विकृतीचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 11:46 AM2021-12-29T11:46:21+5:302021-12-29T15:25:27+5:30
अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रिया हिच्या संशयी वृत्तीने विकृतीचा कळस गाठल्याने तिने तिच्या डोळ्यांदेखत आरोपी मारुतीला तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करावयास लावल्याचे पुढे आले आहे.
वर्धा : आर्वी तालुक्यातील रहिवासी असलेल्या १४ वर्षीय मुलीवरील बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस कोठडीदरम्यान ठोस पुरावे गोळा करण्यासह गुन्ह्याच्या संदर्भातील अधिक माहिती पोलीस जाणून घेत असून, आरोपी प्रिया हिच्या संशयी वृत्तीने विकृतीचा कळस गाठल्याने तिने तिच्या डोळ्यांदेखत आरोपी मारुतीला तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करावयास लावल्याचे पुढे आले आहे.
१४ वर्षीय मुलीवर बळजबरी बलात्कार केल्याप्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपी मारुती मारबदे तसेच प्रिया मारबदे (दोन्ही रा. मोटोडा, बेनोडा) यांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. पीडिता घरी एकटी असताना आरोपी प्रिया हिने तिला घरी बोलावून ती घरात येताच घराचा दरवाजा बंद केला. तू मारुतीसोबत लग्न कर, असे म्हणत प्रिया घराबाहेर पडली. त्यानंतर आरोपी प्रियाने घरी परतल्यावर मारुतीला पीडितेवर तिच्या डोळ्यांसमोरच बळजबरी बलात्कार करावयास लावला. अल्पवयीन पीडिता आणि आरोपी मारुती यांचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने आरोपी प्रियाच्या डोक्यात घर केले होते. घटनेच्या दिवशी तिच्या याच संशयी वृत्तीने विकृतपणाचा कळस गाठला आणि तिने तिच्या डोळ्यांदेखत मारुतीला पीडितेवर बळजबरी बलात्कार करावयास लावल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.
पीडिता डॉक्टरांच्या देखरेखीत
पीडितेला वर्धा यथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. रुग्णालयातील डॉक्टरांचे तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष आहे.
आरोपी प्रियाच्या संशयी वृत्तीने विकृतीचा कळस गाठल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, ती सध्या डॉक्टरांच्या देखरेखीत आहे. तपास सुरू आहे.
- ज्योत्स्ना गिरी, पोलीस उपनिरीक्षक, तथा तपासी अधिकारी.