एकुर्ली गावातील स्मशानभूमीच बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:51 AM2017-09-22T00:51:34+5:302017-09-22T00:51:48+5:30
प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी तथा सौंदर्यीकरण करून व सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासकीय धोरण आहे; पण जिल्ह्यात अनेक गावांत स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड दिसतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी तथा सौंदर्यीकरण करून व सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासकीय धोरण आहे; पण जिल्ह्यात अनेक गावांत स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड दिसतात. यामुळे लगतच्या शेतांचा आधार घेत अंत्यविधी उरकावा लागतो. असाच प्रकार एकुर्ली गावातही पाहावयास मिळतो. या प्रकारामुळे अंतिम संस्कार करताना ग्रामस्थांची गोची होते. याकडे लक्ष देत स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.) नजीकच्या एकुर्ली गावातील स्मशानभूमी बकाल झाली आहे. स्मशानभूमिच्या नावावर एकुर्ली येथे केवळ अल्लीपूर मार्गावर मुख्य रस्त्याच्या कडेला स्मशानशेड आहे. ही स्मशानभूमी दुर्लक्षित असून शेड पूर्णत: जीर्ण झाले आहे. तळेगाव (टा.) जि.प. सर्कलमध्ये येणाºया एकुर्ली गावातील दहा वर्षांपासून पं.स. सदस्य तर सध्या जि.प. सदस्यही आहेत. ते सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे जि.प. सदस्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्मशानभूमी नसल्याने एकुर्लीतील एका शेतकºयाच्या शेतात अग्नी द्यावा लागतो; पण पे्रताला अग्नी देताना पाऊस आल्यास नागरिकांसह पे्रतालाही पाण्याशी झुंज द्यावी लागते. स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. स्मशान शेडला झुडपांसह वेलींचा विळखा असून मृतदेह शेडपर्यंत पोहोचविणेही कठीण झाले आहे. रात्री अंतिम यात्रा न्यायची असल्यास कुठेही पथदिव्यांची व्यवस्था नाही. सहभागींना गॅसबत्तीचा वापर करावा लागतो. पाण्याची सुविधा नसल्याने शेतातील विहिरीचा वापर करावा लागतो. अंत्यसंस्कारात येणाºया या अडचणींकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
पाणी, पथदिवे, बसण्याकरिता ओटेही नाहीत
स्मशानभूमीमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असते; पण एकुर्ली येथे स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड आणि तेही जीर्ण अवस्थेत उभे असल्याने अन्य सुविधांबाबत विचारही करता येत नाही. येथे शेतातील विहिरीचे पाणी अंत्यसंस्कारासाठी वापरावे लागते. रात्री अंत्ययात्रा निघाल्यास काळोखातून वाट काढावी लागते. कुठेही पथदिवे नाही. स्मशानभूमित बसण्यासाठी ओटे नाहीत की वृक्षांची सावलीही नाही. यामुळे अंत्ययात्रेतही अनेक समस्यांचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. गावाकडे दुर्लक्ष करणारे सदस्य सर्कलच्या समस्या कशा सोडवतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.