‘मिशन ग्रीन’ संकल्पनेला लागले ग्रहण

By Admin | Published: June 29, 2017 12:34 AM2017-06-29T00:34:34+5:302017-06-29T00:35:38+5:30

ग्रीन बेल्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले होते.

'Mission Green' eclipsed the idea | ‘मिशन ग्रीन’ संकल्पनेला लागले ग्रहण

‘मिशन ग्रीन’ संकल्पनेला लागले ग्रहण

googlenewsNext

खड्ड्यांमध्ये केवळ काड्याच : संरक्षक कठडे बेपत्ता, जिवंत रोपे नगण्य
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : ग्रीन बेल्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले होते. या वृक्षांचे संगोपन होणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. परिणामी, खड्ड्यांमध्ये रोपांच्या नावावर केवळ काड्याच शिल्लक आहेत. शिवाय संरक्षक कठडेही बेपत्ता झाले आहेत. यामुळे ‘मिशन ग्रीन’ संकल्पनेचाच फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नांचे तीनतेरा वाजले आहे. वृक्षांचे अनेक संरक्षक कठडे मोठ्या प्रमाणात तुटले आहेत. त्यातील बरीच रोपे मृतप्राय अवस्थेत आहे. काही ठिकाणी केवळ खड्डे तर काही ठिकाणी काड्याच शिल्लक आहेत. जिवंत रोपाची संख्या रोडावली असून ५० ते ६० संरक्षक कठडेच आता व्यवस्थित असल्याचे निदर्शनास येते. यामुळे ‘मिशन ग्रीन’ संकल्पनेला ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर हिंगणघाट ते वडनेर दरम्यान दुतर्फा वृक्षारोपण करून हिरवा पट्टा निर्माण करण्याची शासकीय योजना तयार करण्यात आली होती. त्यानुसार महामार्गाला हिरवेगार करण्याच्या प्रयत्नांत १० हजार वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लावून त्यांचे संगोपन, संवर्धन करण्याचे काम निवीदा काढत कंत्राटदाराकडून करून घेण्यात आले. बांबूपासून बनविलेले संरक्षक कठडे रोपांना लावण्यात आले; पण काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने अनेक कठड्यांनी आपली जागाच बदलली आहे. अनेक कठडे तर तत्पूर्वीच तुटले असून वृक्षांना संरक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या कठड्यांचीच स्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे ते वृक्ष संगोपन, संरक्षण करतील काय, हा प्रश्नच आहे. तुटलेल्या कठड्यांमुळे वृक्षसंगोपनात आणखी अडचणी वाढल्या आहे. अनेक वृक्षांची पूढे वाढ होऊ शकली नाही. अनेक रोपे गुरांनी फस्त केले आहेत. शिवाय कोमेजलेल्या रोपांची संख्याही मोठी आहे. रोपांसाठी केलेल्या खड्ड्यांमध्ये आता केवळ काड्याच शिल्लक असल्याचे दिसते.
दहा किमीच्या हरित पट्ट्यातील सुमारे ३० वृक्षांवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे शासनाचा निधी व्यर्थ तर जात नाही नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरवर्षी शासनाद्वारे वृक्षारोपणावर भर दिला जातो; पण वृक्ष जगण्याचे अत्यल्प असल्याने खर्च व्यर्थ ठरत असल्याचे दिसून येते.

शासनाच्या उद्देशालाच तिलांजली
राष्ट्रीय महामार्ग, महामार्ग, राज्य मार्ग, ग्रामीण रस्ते अशा बऱ्याच प्रकारच्या रस्त्यांची निर्मिती सर्वत्र होत आहे. यात सर्वत्र डांबर आणि सिमेंटचे जंगल पसरत आहे. परिणामी, पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ग्रीन बेल्ट तयार करण्याच्या उद्देशाने शासनाने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली. यात रोपांची लागवड करण्यात येते; पण वृक्षांचे संवर्धन होत नसल्याने मूळ उद्देशाला तिलांजलीच मिळत आहे.

Web Title: 'Mission Green' eclipsed the idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.