मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची लोकमत मुद्रण प्रकल्पाला भेट
By admin | Published: February 28, 2017 01:16 AM2017-02-28T01:16:13+5:302017-02-28T01:16:13+5:30
मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.इन्स्टिट्यूटच्या ५४ विद्यार्थ्यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या बुटीबोरीस्थित अत्याधुनिक मुद्रण प्रकल्पाला भेट दिली.
Next
मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.इन्स्टिट्यूटच्या ५४ विद्यार्थ्यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या बुटीबोरीस्थित अत्याधुनिक मुद्रण प्रकल्पाला भेट दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी लोकमतची छपाई व परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पाची कार्यप्रणाली अगदी जवळून पाहिली. मंगळवारी प्रकाशित होणाऱ्या ‘सखी’ पुरवणीची छपाईही यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिली. लोकमतच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची व सौर ऊर्जा प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली. विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापक उपस्थित होते.