महागाईने त्रस्त जनतेला मनसेचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 10:59 PM2018-06-14T22:59:51+5:302018-06-14T22:59:51+5:30
जीवनोपयोगी वस्तूसह पेट्रोल, डिझेल यांच्या वाढलेल्या किमतीने बेजार झालेल्या सामान्य जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काहीसा दिलासा दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील मल्हारी पेट्रोल पंप, भारत पेट्रोल पंप व गिरड येथील कौशिक पेट्रोल पंपावर चार रुपयांनी पेट्रोल स्वस्त....
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट/गिरड : जीवनोपयोगी वस्तूसह पेट्रोल, डिझेल यांच्या वाढलेल्या किमतीने बेजार झालेल्या सामान्य जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काहीसा दिलासा दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील मल्हारी पेट्रोल पंप, भारत पेट्रोल पंप व गिरड येथील कौशिक पेट्रोल पंपावर चार रुपयांनी पेट्रोल स्वस्त करून शासनाच्या भाववाढीचा अभिनव पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला.
चार रुपयांनी पेट्रोल स्वस्त मिळणार म्हणून सकाळपासूनच तीनही पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी दिसून आले. मनसेच्या अभिनव आंदोलनाची दखल नागरिकांनी घेतली असून दिवसभर पेट्रोलपंप गर्दीने गजबजून गेले होते. शिवाय मनसेच्या या अभिनव आंदोलनामुळे प्रस्थापित पक्षातील अनेकांची गोची झाल्याचे दिसून आले. मनसे सत्तेत नसताना जर पेट्रोल स्वस्त करू शकत असेल तर सत्तेत आल्यावर काय नाही करू शकणार, असे प्रश्न नागरिक विचारात असल्याचे दिसून आले. अनेकांनी आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरून घेत पैशाची बचत केली.
या अभिनव आंदोलनासाठी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वादिले यांच्या सोबत अमोल बोरकर, सुनील भुते, प्रवीण श्रीवास्तव, राहुल सोरटे, रमेश घंगारे, किशोर चांभारे, सुधाकर वाढई, राजू सिन्हा, प्रल्हाद तुरारे, लक्ष्मणराव सावरकर, शंकर देशमुख, हेमंत घोडे, धनंजय भोंबे, जितेंद्र रघाटाटे, जयपाल पाटील, संजय गाभूरे, सिद्धार्थ वासेकर, होमराज कामडी, नितीन भुते, अमोल मुडे, नरेश चिरकुटे, अमोल मुडे, गजानन कलोडे, सुशिल घोडे, गजानन महाकाळकर, राजू मुडे, प्रवीण भुते, किशोर भजभूजे, सचिन वाघे, बाळू उजवणे, प्रकाश भलमे, दीपक चांगल, निखिल ठाकरे, मिथून चव्हाण, हरीष वाघ, राहुल जाधव, निखिल शेळके, स्वप्नील पांडे, अतुल इटनकर, मनीष मुडे, कुणाल भुते, अतुल खानखुरे आदी मनसे पद्धधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
गिरड येथील कौशिक पेट्रोल पंपावर म.न. शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज गिरडे, तालुकाध्यक्ष निलेश खाटीक, राहुल गाढवे, संदीप शिवणकर, प्रशांत ठाकुर, पवन दीक्षित, अमोल भांदककर, निलेश बहादुरे, सुशांत लाजूरकर, नामदेव चुटे, विशाल रोहनकर, जितेंद्र नैताम, राहुल कापसे, अमित तेलरांधे, दिनेश बावणे, प्रणय बचाते, प्रफुल्ल कावळे, स्वप्नील तूपे, स्वप्नील कवाडे आदींनी सहभाग घेतला होता.