मोबाईल खेळणे लहान मुलांसाठी धोक्याचे

By Admin | Published: April 23, 2017 02:06 AM2017-04-23T02:06:24+5:302017-04-23T02:06:24+5:30

विज्ञानाच्या माध्यमातून मानव झपाट्याने प्रगती करीत आहे. माहिती तंत्रज्ञानातील मोबाईलच्या शोधामुळे अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत.

Mobile Games Dangers for Kids | मोबाईल खेळणे लहान मुलांसाठी धोक्याचे

मोबाईल खेळणे लहान मुलांसाठी धोक्याचे

googlenewsNext

 वर्धा : विज्ञानाच्या माध्यमातून मानव झपाट्याने प्रगती करीत आहे. माहिती तंत्रज्ञानातील मोबाईलच्या शोधामुळे अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. प्रत्येकाच्या हाती मोबाईल ही सहज गोष्ट झाली आहेत. परंतु, घराघरातील लहान मुलेही आता या मोबाईलच्या विळख्यात सापडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पालकांनी लहान मुलांच्या हाती मोबाईल देणे धोक्याचे ठरणारे आहे.
खेळणे समजून बालक मोबाईलचा अट्टाहास करतात. परंतु त्यांच्या अट्टहासाकडे दुर्लक्ष करण्याची गरज असताना पालाकांकडूनच दुजोरा मिळत असल्याचे दिसून येते. मोबाईलमधून निघणाऱ्या ध्वनीलहरी सर्वांसाठीच घातक असतात. दहा-बारा वर्षापूर्वी भ्रमणध्वनी हा खर्चिक व महागडा असल्याने काही बोटावर मोजण्याइतक्याच नागरिकांकडे तो दिसत होता. परंत,ु आज घरोघरी मोबाईल एखाद्या खेळण्यासारखा वापरला जातो. मोबाईलसाठी लागणारे सिमकार्ड देखील गल्ली बोळात छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत आहे. मोबाईलच्या आकारातही बदल झाला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Mobile Games Dangers for Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.