मोदी सरकारला बांगड्यांचा अहेर
By admin | Published: May 9, 2017 01:02 AM2017-05-09T01:02:21+5:302017-05-09T01:02:21+5:30
देशाच्या सिमेवर शेकडो जवान शहीद होत आहे. काश्मिरची परिस्थिती केंद्र सरकारच्या हाताबाहेर गेली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन : जिल्हा महिला कॉँग्रेसचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशाच्या सिमेवर शेकडो जवान शहीद होत आहे. काश्मिरची परिस्थिती केंद्र सरकारच्या हाताबाहेर गेली आहे. मोदी सरकारच्या आमदार व खासदारांच्या बेलगाम वक्तव्यांमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करीत महिला काँग्रेसच्यावतीने मोदी सरकारला बांगड्यांचा अहेर आंदोलन केले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
वर्धा जिल्हा महिला कॉँग्रेसच्यावतीने मोदी सरकारचा निषेध करून बांगड्या सरकारला पाठविण्यात आल्याची माहिती महिला कॉँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष चारूलता टोकस यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे म्हणाल्या, आंदोलनादरम्यान महिला काँग्रेसच्यावतीने शासनाचा मोदी सरकार पाकिस्तानला उत्तर देण्यात कमी पडत असल्याचा आरोपही आहे. यावेळी कुंदा भोयर, रंजना पवार, अर्पना मुन, पुष्पा लांबट, राजश्री देशमुख, वेणु गायकवाड, निलीमा दंडारे, जयश्री बाळबुधे, शालु इवनातेसह महिला कॉँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.