सहलीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:57 PM2017-12-28T23:57:36+5:302017-12-28T23:57:46+5:30
सहलीला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाºया शिक्षकाला गावकऱ्यांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना इंझाळा येथे गुरुवारी उघड झाली. या शिक्षकावर तो कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थेनेही शिस्तभंगाची कार्यवाही केल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विजयगोपाल/इंझाळा : सहलीला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाºया शिक्षकाला गावकऱ्यांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना इंझाळा येथे गुरुवारी उघड झाली. या शिक्षकावर तो कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थेनेही शिस्तभंगाची कार्यवाही केल्याची माहिती आहे.
येथील यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल हैदराबाद येथे गेली होती. या सहलीदरम्यान शिक्षकाने यातीलच एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. सहलीवरून परत आल्यावर पीडिताने कुटुंबियांना आपबिती सांगितली. याची माहिती गावात पसरताच गावकºयांनी आज शाळेत येत या शिक्षकाला चांगलेच चोपले. शिवाय त्याला पुलगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून शिक्षक नरेंद्र हुलके याच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
शनिवारी सहल परतल्यावर सदर मुलगी शाळेत जाण्यास नकार देत होती. यामुळे तिची आई व काकूने तिला शाळेत न जाण्याचे कारण विचारले. त्यानंतर तिने सहलीदरम्यान घडलेला प्रसंग सांगितला. ही बाब ग्रामस्थांनाही कळल्यावर शिक्षकाला ग्रामस्थांनी चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच संस्था संचालकांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. सदर शिक्षकावर संस्थेकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.
विनयभंग प्रकरणी सहा महिन्याचा कारावास
सेलू - विनयभंग प्रकरणात येथील न्यायाधीशांनी आरोपीस हा महिने कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सविस्तर असे की, रात्री ११ वाजताच्या सुमारास महिला अंगणात झोपून असताना विजय वैरागडे याने विनयभंग केला होता. या प्रकरणी सेलू पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी नेहा पंचारिया यांनी बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपी विजय वैरागडेवर आरोप सिद्ध झाल्यानंतर सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या एक हजार रुपयांतून महिलेस ७०० रुपये देण्याचाही आदेश आहे.