विजेच्या धक्क्यामुळे आईसह चिमुकलीचा मृत्यू, कारंजा घाटगे तालुक्यातील सेलगावची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 10:06 AM2017-08-19T10:06:01+5:302017-08-19T10:10:01+5:30
विजेच्या धक्क्यामुळे आईसह चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कारंजा घा, दि. 19- विजेच्या धक्क्यामुळे आईसह चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाटगे तालुत्यात असणाऱ्या सेलगावात ही घटना घडली आहे. राहत्या घरी कपाटाला अचानक विद्युत करंट आला यात आईसह चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे.
प्रियंका किसना गाखरे (वय 30 वर्ष) या कपाटामधून काही वस्तू काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी कपाटाला करंट पकडला असल्याने प्रियंका कपाटालाच चिकटून राहल्या. आई कपाटाला चिकटून उभी आहे हे पाहून त्यांच्या दोन वर्षीय मुलीने त्यांना हात लावला. तिलाही शॉक लागल्याने ती चिमुकल बाजूला फेकली गेली. शॉक लागून दूर फेकलं गेल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर कारंजा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यासाठी आले. तेथे तिच्यावर उपचार करून तिला नागपूरला पाठविण्यात आलं, पण नागपूर येथे उपचार दरम्यान तिचाही मृत्यू झाला. धनश्री किसना गाखरे असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव आहे.