पैशाकरिता विवाहितेला रॉकेल टाकून पेटविले

By admin | Published: February 6, 2017 12:58 AM2017-02-06T00:58:53+5:302017-02-06T00:58:53+5:30

माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला.

For money, the bridegroom wore a kerosene | पैशाकरिता विवाहितेला रॉकेल टाकून पेटविले

पैशाकरिता विवाहितेला रॉकेल टाकून पेटविले

Next

तरोडा येथील घटना : महिलेचा मृत्यू; पती व सासऱ्याला अटक
कारंजा (घाडगे) : माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर आपली मागणी पूर्ण होत नसल्याचे दिसताना सासरच्या मंडळीने विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटविले. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कारंजा तालुक्यातील तरोडा येथे शनिवारी रात्री घडली. सीमा अमोल मुन्ने (२३) असे मृतक महिलेचे नाव आहे.
सीमाची नातेवाईक पिंगळाबाई चौधरी रा. परसोडी यांनी रविवारी घटनेची तक्रार कारंजा पोलिसात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सीमाचा पती अमोल मुन्ने (२७), सासरे काशिनाथ मुन्ने व सासु चंद्रकला मुन्ने या तिघांवर भादंविच्या कलम ४९८ (अ), ३०४ (ब) व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करताच पोलिसांनी पती अमोल आणि सासरा काशिनाथ या दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा हिचा विवाह अमोल याच्याशी सन २०१२ मध्ये झाला. विवाहानंतर सासरची मंडळी सीमाकडे माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत होते. याकरिता पती व सासू-सासरे तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होते. यातच शनिवारी सायंकाळी सीमा हिला सासरच्या मंडळीची त्रास देणे सुरू केले. यात आपली मागणी पूर्ण होत नसल्याचे लक्षात येताच मुन्ने परिवाराने सीमाच्या अंगावर घरातच रॉकेल टाकून पेटवून दिले. यात तिचा जागीच मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. सदर घटनेची माहिती शेजारच्या मंडळींना नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासरे या दोघांना ताब्यात घेतले आहे.(शहर प्रतिनिधी)

 

Web Title: For money, the bridegroom wore a kerosene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.