पैसे थकले; अडत्यांकडून खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:17 AM2018-11-28T00:17:02+5:302018-11-28T00:18:15+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाचे अडत्यांचे कोट्यवधी रुपये व्यापाऱ्यांनी थकविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारा कसा द्यायचा, असा प्रश्न अडत्यांना पडल्याने ते आक्रमक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाचे अडत्यांचे कोट्यवधी रुपये व्यापाऱ्यांनी थकविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारा कसा द्यायचा, असा प्रश्न अडत्यांना पडल्याने ते आक्रमक झाले. या संदर्भात बाजार समितीच्या उपसभापती यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत जोपर्यंत व्यापाऱ्यांकडून पैसे मिळणार नाही तो पर्यंत उद्यापासून खरेदी बंद करण्याचा इशारा अडत्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे अडत्यांनी सभापतींच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा अडत्यांना आक्रमक होण्याची वेळ आल्याची चर्चा परिसरात होती.
बाजार समितीत सोयाबीन, तूर, चणा व गहू आदी शेतमाल शेतकरी विक्रीसाठी आणतांना दिसत आहे. ही आवक दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी सकाळी अनेक शेतकºयांनी आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीकरिता आणला होता. अडत्यांची सदर आक्रमक भूमिकेची माहिती मिळाल्यानंतर सभापतींच्या सूचनांवरून शेतकऱ्यांकडून त्यांचा शेतमाल खरेदी करण्यात आला. परंतु, अडत्यांच्या माध्यमातून होणारी खरेदी थांबली होती. व्यापाऱ्यांनी मागील सहा महिन्यांपासून अडत्यांचे जवळपास कोट्यवधी रुपये थकविल्याने मंगळवारी खरेदी केलेल्या शेतमालाचे शेतकऱ्यांना चुकारे देण्यासाठी अडत्यांना अडचण निर्माण झाली. बाजार समितीत असलेले शेतमालाची आवक आणि शेतकºयांना चुकारे देण्यासाठी अडत्यांकडे असलेली पैशाची कोरड यामुळे संतप्त झालेल्या अडत्यांनी खरेदी थांबवून उपसभापती पांडूरंग देशमुख यांचा कक्ष गाठला. येथे अडते व अधिकारी यांच्यात चांगलीच चर्चा रंगली होती. बाजार समिती प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास बुधवारपासून खरेदी बंद करण्याचा इशारा अडत्यांनी दिला आहे.