आता 'आई कुणा म्हणू मी, आई घरी ना दारी...'; वाहनाच्या धडकेत माकडीणीचा मृत्यू

By आनंद इंगोले | Published: April 2, 2023 05:20 PM2023-04-02T17:20:42+5:302023-04-02T17:20:56+5:30

स्वत: पासून दूर सारल्याने पिल्लू सुखरुप बचावले, या धडकेत आता आपला जीव जाणार याचा अंदाज आल्याने तिने लगेच पिल्याला आपल्यापासून दूर केले.

Monkey dies while crossing road in Wardha | आता 'आई कुणा म्हणू मी, आई घरी ना दारी...'; वाहनाच्या धडकेत माकडीणीचा मृत्यू

आता 'आई कुणा म्हणू मी, आई घरी ना दारी...'; वाहनाच्या धडकेत माकडीणीचा मृत्यू

googlenewsNext

सेवाग्राम(वर्धा) - उन्हामुळे माकडांचा कळप आता जगल सोडून इतरत्र भटकताना दिसत आहे. समृद्धी महामार्गावर आपल्या पिल्याला पोटाशी घेवून महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने माकडीणीला जबर धडक दिली. या अपघातात मृत्यूची चाहूल लागताच माकडीणीने पोटाशी असलेल्या पिल्याला दूर लोटले. गंभीर जखमी माकडीणीला करुणाश्रमात दाखल केले असता तिला वाचविण्यात अपयश आले. डोळ्या देखत आपल्या आईचा मृत्यू पाहून आता 'आई कुणा म्हणू मी, आई घरी ना दारी...' अशी अवस्था या पिल्याची झाली आहे.

समृध्दी माहामार्गावर आता अपघात नवीन राहिले नाही. या महामार्गावर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने तेही अपघातचे कारण ठरत असून त्यांनाही आपला जीव गमवावा लागत आहे. माकडांचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याच्या शोधात माकडांचे कळप या महामार्गावरुन रस्ता ओलांडताना नजरेत पडतात. वर्धा लगतच्या येळाकेळी येथील समृद्धीच्या इंटरजेंचजवळ रविवारी सकाळी एक माकडीण आपल्या पिल्लाला पोटाशी घेवून रस्ता ओलांडत होती. यादरम्यान भरधाव येणाऱ्या वाहनाने तिला धडक दिली.

या धडकेत आता आपला जीव जाणार याचा अंदाज आल्याने तिने लगेच पिल्याला आपल्यापासून दूर केले. परंतू शेवटी मायेचा जिव्हाळा असल्याने पिल्लू पुन्हा तिच्या जवळ जावून उभं राहिलं. माकडीणला जबर मार लागल्याने ती तडफडत होतं आणि तीच पिल्लू आईला वाचविण्याकरिता कुणाच्या तरी मदतीची प्रतीक्षा करीत होतं. तेवढ्यात एका रुग्णवाहिकेतील चालक व त्याचा सहकारी तेथे पोहोचला आणि त्यांनी महामार्गाच्या इंटरचेंजवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने माकडीण व पिल्याला उचलून पिपरीच्या करुणाश्रमात आणले. परंतु तिला वाचविण्यात अपयश आले. यातून पिल्लू वाचले असून ते मृत आईला कवटाळून उठविण्यासाठी केविलवाणी धडपड करीत होते. हा सर्व प्रकार पाहून उपस्थितांच्याही डोळ्यातून अश्रूधारा बाहेर पडल्या.

रुग्णवाहिकेचा चालक अन् सहकारी आला धावून
येळाकेळी येथील समृद्धीच्या इंटरचेजवळ एक माकडीण अज्ञान वाहनाच्या धडकेत जखमी होऊन तिचं पिल्लू तिच्या शेजारी असल्याचे रुग्णवाहिका चालक किशोर सूर्यवंशी व विक्की पठाण यांना दिसले. हे दोघेही ओडीसा येथून मृतदेह सोडून नाशिकला जात होते. त्यांनी लागलीच रुग्णवाहिका थांबवून इंटरचेंजवरील कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधला. कर्मचारी घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी माकडीण व पिल्लाला नजिकच्या पिपरी येथील करुणाश्रमात दाखल केले. मात्र तिला वाचविण्यात यश आले नाही. सध्या पिल्लू करुणाश्रमात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Web Title: Monkey dies while crossing road in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.