माकडांचा हैदोस; बंदोबस्ताकडे दुर्लक्ष

By admin | Published: April 18, 2017 01:23 AM2017-04-18T01:23:37+5:302017-04-18T01:23:37+5:30

न्हाची तीव्रता वाढताच जंगल भागात वन्य प्राण्यांच्या खाद्याची कमतरता जाणवू लागली आहे.

Monkeys Haidos; Ignore the settlement | माकडांचा हैदोस; बंदोबस्ताकडे दुर्लक्ष

माकडांचा हैदोस; बंदोबस्ताकडे दुर्लक्ष

Next

पाणी, खाद्यासाठी भटकंती : वाळवणासह घरांचेही मोठे नुकसान
वर्धा : उन्हाची तीव्रता वाढताच जंगल भागात वन्य प्राण्यांच्या खाद्याची कमतरता जाणवू लागली आहे. शिवाय पाण्याची कमतरता असल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. यात माकडांचाच ग्रामीण भागातील हैदोस अधिक वाढला असून नागरिकांना जगणे असह्य झाले आहे. मर्कट लिलांमुळे अपघातही वाढले असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश जंगलभाग असलेल्या तालुक्यांमध्ये माकडांचा हैदोस पाहावयास मिळतो. कळपाने राहणारी ही माकडे गावांत धुमाकूळ घालत आहेत. छतावर, घरांसमोर ठेवलेल्या वाळवणावर यथेच्छ ताव मारत असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय गावांत या घरावरून त्या घरावर उड्या मारत असल्याने कवेलूंचे नुकसान होत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर माकडांचा राबता राहत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

मर्कटांच्या हल्ल्यात दोन दुचाकीस्वार जखमी
सेलू - माकडाच्या कळपाने रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नागपूर येथून वर्ध्याकडे जाणाऱ्या दुचाकी चालकासह त्याच्या सहकाऱ्याला जखमी केले. ही घटना केळझर येथे घडली. या माकडांच्या कळपाबाबत नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेश जगणे (२५) रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी नागपूर, असे जखमी युवकाचे नाव आहे.
नागपूर येथील उमेश जगणे, रोहित कनोजे व चंद्रशेखर कनोजे (२०) हे तीघेही पेंटींगचे काम करण्यासाठी एमएच ३१ एडब्ल्यू ५५८० क्रमाकांच्या दुचाकीने वर्धा येथे जात होते. केळझर येथील बौद्ध विहाराजवळ आले असता त्यांच्या दुचाकीवर माकडाच्या कळपाने हल्ला चढविला. यात तिघेही दुचाकीवरून खाली पडले. माकडाच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात उमेश जगणे हा जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. त्याच्या सहकाऱ्याच्या हाताला मार लागला. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. गावात तसेच परिसरात अनेक दिवसांपासून माकडांनी धुमाकूळ घातला आहे. माकडांच्या भीतीने रस्त्याने जाताना नागरिकही घाबरत आहेत. घरांवरील कवेलू वारंवार फुटत आहेत. याबाबत केळझर वन विभागाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे.

Web Title: Monkeys Haidos; Ignore the settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.