माकडांच्या हैदोसाने सेलूकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:09 AM2019-01-02T00:09:34+5:302019-01-02T00:09:57+5:30
जंगालात पाण्याची वानवा असल्याने पाण्याच्या शोधात माकडांनी आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याने वन विभागाने लक्ष देत या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : जंगालात पाण्याची वानवा असल्याने पाण्याच्या शोधात माकडांनी आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याने वन विभागाने लक्ष देत या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
सध्या गावात शिरलेल्या माकडांच्या कळपाने चांगलाच हैदोस घातला आहे. घरावरील पाण्याच्या टाक्या व पाईप, परिसरातील झाडे आणि काही घरावरील कवेलुचेही नुकसान करीत आहे. घरासमोरील उभे असलेली वाहने खाली पाडण्याचा सपाटा चालविल्याने यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मांकडांच्या एका कळपात जवळपास १५ ते २० वीसची संख्या आहे. ही सर्व माकडे कळपानेच एका परिसरात ठिय्या मांडत असून घराच्या एका छतावरुन दुसऱ्या छतावर उड्या मारणे, वाळवणाची नासाडी करण्यासोबतच घरातील खायच्या वस्तु पळविण्यापर्यतही चाल करीत आहे. इतकेच नाही तर मोकळ्या घरात आत शिरायलाही घाबरत नसल्याने महिला व लहान बालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने या माकडांच्या कळपांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सेलूकरांनी केली आहे.
माकडांचा कळप येताच दारे-खिडक्या होतात बंद
दिवस उजाडताच मांकडांचा कळप गावाकडे कुच करतात. एकावेळी १५ ते २० माकड येत असल्याने माकड आल्याबरोबर घराच्या दारे-खिडक्या लावण्याची धावपळ उडते.
माकडांनी घराच्या छतावरील पाण्याच्या टाक्या व पाईचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यांना हकलण्याकरिता गेले असता ते अंगावर चाल करुन येतात. त्यामुळे बंदोबस्त करण्याची गरज आहे.
वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करावा. नगर पंचायतीने या समस्येकडे लक्ष द्यावे माकडांच्या उपद्रव्यामुळे प्रचंड त्रास व आर्थिक नुकसान होते. लहानमुले व महिलांच्या अंगावर माकडे धावून जातात.
-पंडीत म्हैसकर, प्रभाग १२,सेलू
माकडांच्या कळपांनी जनजीवन विस्कळीत केले आहे. अत्यंत त्रास होत आहे. नगर पंचायतीने वनविभागाला कळवून बंदोबस्त करावा अन्यथता आमची नुकसान भरपाई द्यावी. कुणीच लक्ष देत नाही ही शोकांतिका आहे.
-शिरीष देवतळे, विकास चौक सेलू