मोझरी-कानगाव रस्ता खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:15 AM2017-10-25T01:15:47+5:302017-10-25T01:16:00+5:30
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंअर्गत गावागावापर्यंत मजबुत डांबरीकरण रस्ते तयार करण्यात आले; परंतु काही वर्षांतच या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोझरी(शे.) : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंअर्गत गावागावापर्यंत मजबुत डांबरीकरण रस्ते तयार करण्यात आले; परंतु काही वर्षांतच या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. कानगाव ते मोझरी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याच्या कडा खचल्या आहेत. यामुळे अपघाची शक्यता बळावली असून याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कापसी मार्गे राळेगाव जाण्याकरिता हा मार्ग कमी अंतराचा असल्याने यावर वाहतूक वाढली आहे. या वाढलेल्या वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग आता तोकडा पडत आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून ते कानगाव पर्यंतच असल्याचे दिसत आहे. कानगाव समोर हा रस्ता अरंद आणि खड्डेमयच राहणार असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि खचलेल्या सार्डड यामुळे येथे रात्रीच्या सुमारास अपघात होण्याची मोठी भीती असते. यातच या मार्गे वर्धा नदीतून रेती घेवून येत असलेल्या वाहनांची वर्दळ असल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहे. यामुळे रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात आली असून याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मोझरी(शे.) कानगाव हा मार्गाचा काही भाग खड्डेमय झाला आहे. सोबतच वाहतूक वर्दळीचा विचार करता मार्गाचे रुंदीकरण करणे महत्त्वाचे आहे. मोझरी(शे.),कोसुर्ला, मनसावळी हा मार्ग पूर्णत: डांबर उखडून रस्ता खड्डेमय झाला आहे. या मार्गावर केवळ खड्डेच नाही तर रस्त्याच्या कडेला झुडपांचा विळखा पडला आहे. यामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. याची माहिती या भागातील लोकप्रतिनिधींना देण्यात आली असून त्यांच्याकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावर पुलगाव देवळीकडून आजनसराकडे जाणाºया वाहनाची वर्दळ असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मोझरी, खानगाव, आंबोडा हा मार्ग पूर्णत: खड्डेमय स्थितीत आहे. याकडे विभागाचे दुर्लक्ष दिसून येते. मोझरी(शे.)-पोटी मार्गाचे अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडलेले आहे. नाल्यावरील पुलांची स्थिती खराब आहे. मोझरी -कापसी हा ६ कि़मी. मार्ग दुर्लक्षित असून या मार्गाचे साधे खडीकरणही करण्यात आल नसल्याचे वास्तव आहे.