समुद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:25 AM2018-07-09T00:25:36+5:302018-07-09T00:28:13+5:30

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका समुद्रपूर तालुक्याला बसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण कक्षाने घेतली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यातील एकूण १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी ७७ घरांसह १२ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

Most of the storms in Samudrapula | समुद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका

समुद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका

googlenewsNext
ठळक मुद्देघरांसह गोठ्यांचेही नुकसान : संभाव्य धोक्यामुळे शेकडो कुटुंबीयांना हलविले होते सुरक्षित ठिकाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका समुद्रपूर तालुक्याला बसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण कक्षाने घेतली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यातील एकूण १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी ७७ घरांसह १२ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
गुरूवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारीही कायम होता. त्यानंतर पावसाने काहीशी उघाड दिली आहे. गुरूवारी व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जलाशयांच्या पाण्याच्या पातळीवर वाढ झाली आहे. शिवाय सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने याचा परिणाम समुद्रपूर तालुक्यातील १६८ गावातील १०९ कुटुंबियांवर झाला. पुराचे पाणी घरांमध्ये घुसल्याने हमदापूर येथील १६, सिंदी (रेल्वे) येथील ५० तर दहेगाव गोसावी येथील ११ जणांना सुरक्षित ठिकण असलेल्या अंगणवाडीत हलविण्यात आले होते. सदर व्यक्तींना संभाव्य धोका लक्षात घेवून रात्र अंगणवाडीत काढावी लागली. जिल्ह्यात २७१०.७३ मिमी पाऊस झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली असून जिल्ह्यात अतिवृष्टीच झाल्याचे तसेच सध्या परिस्थिती सामान्य असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
५ हजार ७६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
समुद्रपूर तालुक्यातील ५ हजार ७६५ हेक्टरवरील शेत पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी व सेलू तालुक्यातील किती हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले याची नोंद जिल्हा प्रशासनाने सध्या घेतली नसल्याचे सांगण्यात येते, हे विशेष.
उपराजधानीतील अधिकाऱ्यांना दिली जातेय माहिती
जिल्ह्यातील आठही तालुका प्रशासनाकडून वेळोवेळी पूर परिस्थिती व पावसाची माहिती घेवून ती नागपूर येथील संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना वर्धा जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्यावतीने दिली जात आहे. शिवाय त्यांच्याकडून दिल्या जाणाºया सुचनाचे पालन करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनातील आपत्ती निवारण कक्षाचे कर्मचारी करीत असल्याचे सांगण्यात आले.
पुरात अडकलेल्या १५ जणांना काढले सुखरूप बाहेर
पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकूण १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. हिंगणघाट तालुक्यातील टिकाराम मुडे (४२), विनोद आत्राम (२५), सुरेखा आत्राम (२१), पुरुषोत्तम आत्राम (२३) व अजय आत्राम (०१) यांच्यासह समुद्रपूर तालुक्यात शेडगाव आदजा शिवारातील पटेल यांच्या डेरीफार्म मध्ये पुराच्या वाढत्या पाण्यामुळे अडकलेल्या दहा मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
 

Web Title: Most of the storms in Samudrapula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.