हिंगणघाट तालुक्यातील सर्वाधिक गावांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 09:01 PM2019-05-15T21:01:29+5:302019-05-15T21:02:18+5:30
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ करीता निवड करण्यात आलेल्या १९१ गावांमध्ये सर्वाधिक ३५ गावे एकट्या हिंगणघाट तालुक्यातील आहे. निवड झालेल्या गावात यशोदा नदी समाविष्ट असलेल्या २८ गावांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ करीता निवड करण्यात आलेल्या १९१ गावांमध्ये सर्वाधिक ३५ गावे एकट्या हिंगणघाट तालुक्यातील आहे. निवड झालेल्या गावात यशोदा नदी समाविष्ट असलेल्या २८ गावांचा समावेश आहे.
८ तालुक्यातील १९१ गावांमध्ये वर्धा तालुक्यातील कामठी, चंडकापूर, बोरगांव (ना.), धुळवा, दिग्रज, धोत्रा (का.), गोजी, रायफुली, येरणगाव, येसंबा, भानखेडा , धानोरा, पुजई, सेवा, मांडवा, जुलई, साखरा , वागदरा, तान्हापूर रिठ, दत्तपूर, आष्टा, आजगांव, आसाळा, फ त्तेपूर, इंटाळा (रिठ.), जामनाळा (रिठ.), सुलतानपूर, शिवापूर, अशरफपूर, भवानपूर, मांडवगड तसेच सेलू तालुक्यातील रायपूर (जंगली.), दोडकी, चारगांव, कुºहा, गायमुख, बोरखेडी (कला.), धोनाली (मेघे.), मसाळा, खैरी (कामठी.), धोंडगाव, खडका, पिंपळगांव, दिग्रस, चारमंडळ, पळसगांवबाई, इंटाळा, कोलगांव, ब्राम्हणी, खेरडा, बाभुळगांव, देवळी तालुक्यातील गौळ, कृष्णापूर, आंदोरी, सिगारवाडी, दापोरी , इंझापूर, नासिरपूर, गंगापूर, आंजी, ब:हाणपूर, रूद्रापूर, बहादपूर, मुरादपूर, गोपाळपूर, कोल्हापूर (राव.), हुस्रापुर (दत्तपूर), निमगव्हाण , कानगोकुळ, दहेगांव (धांदे),एकपाळा, खडकी, जामणी, चिखली, रायपूर, टाकळी चणा, ममदापूर, निमसडा, पाथर, सरूल, बाबापूर, आर्वी तालुक्यातील मदना, बोरखडी, कासिमपूर, नांदपूर,एकलारा, मांडवा, खानवाडी, मिरापूर (बो.), जाम, पिंपळगांव (भोसले.), माटोडा, बेनोडा, रेनकापुर, दर्यापूर, लाडनापूर, सर्कसपूर, टोणा,अडेगांव, सारंगपूरी, इठलापूर, आष्टी तालुक्यातील मोमिनाबाद, टेकोडा, खडका, सुजातपूर, पेठ अहमदपूर, खडकी, बेलोराखुर्द, आनंदवाडी, बेलगावडी, अंबीकापूर, जोलवाडी, खंबीत, कारंजा तालुक्यातील खैरी, सारशी, हेटी, जुनोना, बोटोणा, बोरगांव चेक , रिधापूर, मेढागड, कारंजा, रानवाडी, जऊरवाडा, एकांबा, पारडी (हेटी.), नरसिंगपूर, गारपीठ, भिवापूर, जऊरखेडा, तुलनारिठ , धावसा (खु.), खापरी , कन्नमवारग्राम (हेटी.) तसेच हिंगणघाट तालुक्यातील कात्री, सास्ताबाद, गोविंदपूर, कोपरा, वैजापूर (मा.), ढिवरी पिपरी, सोनेगांव, डोरला, नांदगाव (म.), परसोडा, रांगणा, धर्मपूर, शेकापूर (मो.), आर्वी (छोटी.), सिरसगांव, पोटी, कुटकी, इसापूर, बाबापूर, बोरगांव (दातार), बिड (आजनगाव), बोरखेंडी, दाभा, गोपालपूर (रिठ.), चिकमोह, चिंचोली, बोरगांव (ना.), कुरणरीठ (येरला.), गजनापूर, आकासकांड,चिंचोली (कापसी),भगवा, सोनेगांव (खु.), निघा, येरडगांव, समुद्रपूर तालुक्यातील विखणी, बरबडी, मांडगांव, तांभारी, रूनका, झुनका, उंदीरखेडा, महागांव ,लोणार, लोखंडी, आर्वी, तळोदी, चापापूर, निभा, भोसा, सुजातपूर, आष्टा, सेवा , वानरचुआ , पवनगांव, डोंगरगांव,उमरी आदी गावांचा समावेश आहे. या गावात जिल्हा परिषद, कृषी विभाग आदीसह शासनाच्या विविध यंत्रणाकडून कामे होणार आहेत.
दुष्काळावर मात करण्यासाठी अभियान महत्त्वाचे
देशात पावसाचे प्रमाण दिवसे न दिवस कमी होत आहे. गेल्या वर्षी वर्धा जिल्ह्यात ७७ टक्के पाऊस झाला. त्यामुळे यंदा वर्धा शहरासह अनेक गावांना कृत्रिम पाणी टंचाईचे संकट भेडसावट आहे. यावर मात करण्यासाठी जलयुक्त अभियान महत्वाचे ठरणारे आहेत. राज्यात पाणी फाऊंडेशनसह विविध सामाजिक संस्था गावे पाणीदार करण्यासाठी सरसावल्या आहेत. ठिकठिकाणी नागरिक भर उन्हाळ्यातही श्रमदानासाठी सरसावले आहेत.