अंगणवाडीच्या चाब्या घेत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:56 PM2017-09-25T22:56:01+5:302017-09-25T22:56:19+5:30

मानधन वाढीचे आश्वासन शासनाने पाळले नसल्याने अंगणवाडी सेविकांनी राज्यपातळीवर बेमुदत संप पुकारला आहे.

Movement of the anganwadi keys | अंगणवाडीच्या चाब्या घेत आंदोलन

अंगणवाडीच्या चाब्या घेत आंदोलन

Next
ठळक मुद्देजिल्हाकचेरीसमोर ठिय्या : कृती समिती आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मानधन वाढीचे आश्वासन शासनाने पाळले नसल्याने अंगणवाडी सेविकांनी राज्यपातळीवर बेमुदत संप पुकारला आहे. या संपाची दखल घेत शासनाने मानधन वाढीचा निर्णय घेतला; पण हा निर्णय मान्य नसल्याचे म्हणत अंगणवाडी सेविकांच्या कृती समितीने हा संप सुरूच ठेवला. यात सोमवारी वर्धेत अंगणवाडी सेविकांनी अंगणवाड्यांच्या चाब्या ताब्यात घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला.
शासनाचे बाल संस्कार केंद्र म्हणून अंगणवाडीकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील महिलांना व मुलांना आरोग्याचे मार्गदर्शनही याच केंद्रातून करण्यात येत आहे. असे असताना येथे काम करणाºया महिलांना मिळणारे मानधन तोकडे असल्याचे म्हणत त्यांनपी संप पुकारला. या संपाला आता दोन आठवड्याचा कालावधी होत आहे. त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अंगणवाडी समितीच्या सदस्यांकडून होत आहे.
शासनाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केले जाते. जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांना पोषण आहाराच्या साहित्याचा पुरवठा गत काही महिन्यांपासून शासनाने केलेला नाही. बचत गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्या जात आहे. केंद्र व राज्य सरकारची ग्रामीण भागातील नागरिकांशी नाळ जुळवून देणाºया सदर अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या गत काही वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्यांच्याकडून अल्प मोबदल्यावर विविध कामे करून घेतली जातात. अंगणवाडी सेविकांना केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाºयांप्रमाणे सर्व सोई-सुविधा देऊन त्यांच्या मानधनात समाधानकारक वाढ करण्यात यावी या मुख्य मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन सदर आंदोलनादरम्यान जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. विविध मागण्यांची सोडवणूक होईस्तोवर केंद्राची चाबी देण्यात येणार नाही, असेही निवेदनातून संबंधीतांना कळविण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्त्व दिलीप उटाणे, विजया पावडे, मैना उईके, मंगला उईके, वंदना कोळणकर, अस्लम पठाण यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Movement of the anganwadi keys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.