वर्धा नदीवरून पाणी घेण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:10 AM2017-08-24T00:10:23+5:302017-08-24T00:10:43+5:30

वणी शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे यंदा पावसाभावी वाळवंट झाल्याने .....

Movement of water from Wardha river | वर्धा नदीवरून पाणी घेण्याच्या हालचाली

वर्धा नदीवरून पाणी घेण्याच्या हालचाली

Next
ठळक मुद्देवणीत भीषण पाणी टंचाईचे सावट : नवरगाव धरण तळ गाठण्याच्या स्थितीत

संतोष कुंडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे यंदा पावसाभावी वाळवंट झाल्याने व निर्गुडा नदीच्या माध्यमातून वणी शहरापर्यंत पाणी पोहचविणारे नवरगाव धरण तळ गाठण्याच्या स्थितीत असल्याने वणी शहरावर भीषण पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे.
दरम्यान, या संकटावर मात करण्यासाठी वणी नगरपालिकास्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. वणी तालुक्यातील रांगणा गावाजवळून वाहणाºया वर्धा नदीच्या डोहातून वणी शहराची तहान भागविण्यासाठी पाणी घेतले जाणार आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून तसा ठरावही पालिकेने घेतला आहे. रांगणा ते वणीपर्यंत पाईप लाईन टाकण्यात येणार असून त्याचा खर्च आठ ते १२ कोटीपर्यंतच्या घरात आहे. हा निधी कोणत्या मार्गाने उपलब्ध करायचा, याचेही चिंतन पालिकास्तरावर सुरू आहे. यासोबतच वणी शहरासाठी स्वर्णजयंती योजनेअंतर्गत वर्धा नदीवर ८० कोटी रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना तयार करण्याच्याही हालचाली सुरू असून या कामासाठीची निविदा ‘अपलोड’ करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. यासाठी वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ना.हंसराज अहीर हेदेखील प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या नवरगाव धरणात केवळ २८ टक्के जलसाठा असून तो अगदी काही महिने पुरेल ईतका आहे.
...तर उद्रेक होण्याची भीती
यंदा वणी उपविभागात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पर्जन्यमान झाल्याने नदी, नाले, धरण कोरडे होण्याच्या स्थितीत आहेत. या पाणी टंचाईचा फटका वणी शहराला मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे. आजच उपाययोजना न केल्यास पाणी टंचाईच्या काळात पालिकेच्या नगरसेवकांसह पदाधिकाºयांना नागरिकांच्या उदे्रकाला सामोरे जावे लागणार आहे.

येत्या डिसेंबरपर्यंत वर्धा नदीत पाईपलाईन टाकून पाणी घेण्याचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता नवरगाव धरणातून पुन्हा दोन क्युबिक मीटर पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सोबतच शहरात नव्याने १३ ट्युबवेल तयार करण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.
-तारेंद्र बोर्डे
नगराध्यक्ष वणी.

Web Title: Movement of water from Wardha river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.