निवडणुकीच्या तोंडावर एमपी बनावटीची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:00 AM2019-10-14T06:00:00+5:302019-10-14T06:00:13+5:30

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सेवाग्राम रेल्वेस्थानक टी-पॉइंटजवळ नाकाबंदी करीत छापा घालून सदानंद संतोष कंजरभाट व प्रकाश बोरसरे या दोघांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्यांच्याकडून ७५० मि. लि. चे मध्य प्रदेश बनावटीचे बॉम्बे स्पेशल व्हिस्कीचे बंपर किंमत ३५ हजार ६२० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

MP fake liquor confiscated in the face of elections | निवडणुकीच्या तोंडावर एमपी बनावटीची दारू जप्त

निवडणुकीच्या तोंडावर एमपी बनावटीची दारू जप्त

Next
ठळक मुद्देदोघे अटकेत : शहर ठाण्याच्या डीबी पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेशातून वर्ध्यात अवैधरीत्या दाखल झालेला दारूसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत ३५ हजार ६२० रुपये आहे. शहर ठाण्याच्या (डीबी) गुन्हे प्रगटीकरण पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली.
सदानंद संतोष कंजरभाट वय २१ रा. इतवारा बाजार, वर्धा, प्रकाश नामदेव बोरसरे वय ३५ रा. शनी मंदिरामागे, सालोड (हिरापूर), वर्धा अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सेवाग्राम रेल्वेस्थानक टी-पॉइंटजवळ नाकाबंदी करीत छापा घालून सदानंद संतोष कंजरभाट व प्रकाश बोरसरे या दोघांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्यांच्याकडून ७५० मि. लि. चे मध्य प्रदेश बनावटीचे बॉम्बे स्पेशल व्हिस्कीचे बंपर किंमत ३५ हजार ६२० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हा दारूसाठा मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथून रेल्वेगाडीद्वारे वर्ध्यात आणला जात होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे व उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेश पारधी व गुन्हे प्रगटीकरण पथकाचे सहायक फौजदार दत्तात्रय ठोंबरे, नायक पोलिस शिपाई सचिन इंगोले, सचिन धुर्वे, पोलिस शिपाई दिनेश राठोड आदींनी केली. कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

दारूविक्रेते लढविताहेत शक्कल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमांवर पोलिस विभागाच्यावतीने तब्बल २० चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. त्यामुळे दारू वाहतुकीला लगाम लागल्याने दारूविक्रेत्यांकडून नानाविध शक्कल लढविल्या जात आहेत. दारू वाहतुकीकरिता एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्स एवढेच नव्हे, तर रेल्वेगाडीचाही वापर केला जात आहे. पोलिस विभागाने एसटी महामंडळाच्या बसेस, रेल्वेगाडी, खासगी वाहनांची कसून तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: MP fake liquor confiscated in the face of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.