खासदार चषक कुस्तीचा महासंग्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:11 AM2019-01-19T00:11:20+5:302019-01-19T00:11:55+5:30
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्या मान्यतेने, वर्धा कुस्तीगीर परिषद व सार्वजनिक बजरंग व्यायामशाळा देवळी यांच्यावतीने ४१ वी कुमार राज्यस्तरीय पुरुष अंजिक्यपद कुस्ती स्पर्धा, २१ वी वरिष्ठ महिला तर तिसरी मुली राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्या मान्यतेने, वर्धा कुस्तीगीर परिषद व सार्वजनिक बजरंग व्यायामशाळा देवळी यांच्यावतीने ४१ वी कुमार राज्यस्तरीय पुरुष अंजिक्यपद कुस्ती स्पर्धा, २१ वी वरिष्ठ महिला तर तिसरी मुली राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नगर पालिकेच्या विदर्भ केसरी रामदास तडस स्टेडियमवर २७ ते ३० जानेवारी दरम्यान कुस्तीचा महासंग्राम रंगणार आहे, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी दिली आहे.
४१ व्या कुमार राज्यस्तरीय पुरुष अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन २७ जानेवारीला गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याहस्ते तर २१ वी वरिष्ठ महिला व ३ री मुली राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेदरम्यानच्या कार्यक्रमांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार अरुण अडसड, आ.बच्चू कडू, आ. अनिल बोंडे, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ.डॉ. रामदास आंबटकर, आ. रणजित कांबळे, आयुक्त डॉ. संजीव कुमार, डॉ. सिंधूताई सपकाळ यांच्यासह भाजपाचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, महाप्रबधंक भुपेंद्र शहाणे, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, विजय मुडे, माजी आमदार दादाराव केचे, विदर्भ कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुधीर दिवे, जि.प.अध्यक्ष नितीन मडावी, प्रताप अडसड, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, सभापती मुकेश भिसे, जयश्री गफाट, सोनाली कलोडे, निता गजाम, देवळी पं. स. च्या सभापती विद्या भुजाडे, वर्ध्याच्या सभापती महानंदा ताकसांडे, हिंगणघाटचे गंगाधर कोल्हे, सेलुच्या कांचन मडकान, आर्वीच्या शिला पवार, कारंजाचे मंगेश खवशी, आष्टीच्या निता होले तसेच वरुडच्या नगराध्यक्ष स्वाती आडे, मोर्शीच्या नगराध्यक्ष शिला रोडे, शेंदुरजनाघाटचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, नांदगांव (खंडे.) चे नगराध्यक्ष संजय पोपळे, समुद्रपुरचे नगराध्यक्ष गजानन राऊत, सेलूच्या नगराध्यक्ष शारदा माहुरे, वर्धा बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल,प्रादेशिक प्रदुषण नियंत्रण अधिकारी राहुल वानखेडे, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, क्रीडा व युवक संचालनालयाचे उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी, विष्णू भुतडा, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, वर्ध्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे, आर्वीचे प्रशांत सव्वालाखे, देवळीच्या सुचिता मडावी, पुलगांवच्या शितल गाते, सिंदीच्या नगराध्यक्ष सुनीता शेंडे आदीची उपस्थिती राहणार आहे.