खासदारांनी जाणली पाणीटंचाईची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 09:49 PM2019-05-09T21:49:49+5:302019-05-09T21:50:39+5:30

कोरडे झालेले नदी, नाले, यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाईच्या समस्येंची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर मात करण्याच्या दृष्टीने खासदार रामदास तडस यांनी नगराध्यक्ष शीतल गाते यांच्यासह संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना घेवून गुरूवारी पुलगाव बॅरेज, गुंजखेडा, नाचणगाव, पुलगाव पाणी पुरवठा योजना वर्धा नदीतील पाणी साठा ......

MPs knew water scarcity problem | खासदारांनी जाणली पाणीटंचाईची समस्या

खासदारांनी जाणली पाणीटंचाईची समस्या

Next
ठळक मुद्देपुलगाव परिसरातील गावांचा दौरा : बॅरेजची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : कोरडे झालेले नदी, नाले, यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाईच्या समस्येंची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर मात करण्याच्या दृष्टीने खासदार रामदास तडस यांनी नगराध्यक्ष शीतल गाते यांच्यासह संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना घेवून गुरूवारी पुलगाव बॅरेज, गुंजखेडा, नाचणगाव, पुलगाव पाणी पुरवठा योजना वर्धा नदीतील पाणी साठा आदीची प्रत्यक्ष पाहणी करून पाणी पुरवठा योजना सक्षम करून पाणी टंचाईवर मात करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
सध्यातरी शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे शहराला ८ दिवस नंतर पाणी पुरवठा होऊ शकत नव्हता. परंतु नगर प्रशासनाने यावर त्वरीत उपाययोजना केंल्यामुळे आता शहराला तीन दिवसाआड, पाणी पुरवठा होत असला तरी उपलब्ध पाणी साठा मे अखेरपर्यंत पुरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु मे नंतर निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेता खा. तडस यांनी संबंधीत विभागाचे अधिकारी व नगराध्यक्ष शितल गाते, उपाध्यक्ष आशिष गांधी, पाणी पुरवठा सभापती पूनम सावरकर, देवळी पं.स. सभापती विद्या भुजाडे यांच्यासह निम्न वर्धा प्रकल्प कालवा विभागाचे अभियंता नरेंद्र निमजे, कार्यकारी अधिकारी रवी बºहाडे, प्रकल्प विभागाचे अधिकारी बारापात्रे, यांच्यासह सकाळी ९ वाजता विटाळा काठावर बांधकाम सुरू असलेल्या पुलगाव बॅरेजची प्रत्यक्ष पाहणी केली. ९ मे २०१० साली सुरू झालेल्या या बॅरेजचे काम मार्च २०१३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु आर्थिक कारणास्तव या बॅरेजचे काम थंडबस्त्यात पडले होते. अखेर निम्न वर्धा प्रकल्प हा केंद्र शासनाने आपल्याकडे घेतला व २०१८ मध्य चौथी प्रशासकीय मान्यता मिळून या बॅरेजचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. प्रारंभी ९२ कोटी खर्चाच्या बॅरेजच्या कामात १८ टक्के वाढ होवून आज हा जवळपास ३०० कोटीच्या खर्चात गेला. बॅरेज काम केवळ १० टक्के शिल्लक राहिले असून तेही लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा खासदार तडस यांनी व्यक्त केली आहे.
यानंतर पुलगाव, गुंजखेडा, नाचणगाव पाणी पुरवठा योजना इनटेक विहिर आदीची पाहणी करण्यात आली. बॅरेज जवळ वर्धा नदीला मिळणाºया नाल्याचे दुषित व घाण पाणी बॅरेजमध्ये येवू नये यासाठी याठिकाणी भिती बांधून नाल्याचे पाणी परस्पर बॅरेज बाहेरून प्रवाहित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार तडस यांना देण्यात आली. नदीतील पाणी साठ्याची त्यांनी पाहणी केली. पाणी टंचाईवर मात करण्याचे दृष्टीने अधिकाºयांशी खासदार तडस यांनी बैठकीत चर्चाही केली. शहरातील तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असणाºया जलवाहिन्या दुरस्त करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. पुलगाव शहराला सध्या तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. असलेला पाणी साठा लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, ओबीसी मंडळाचे प्रांतीय महासचिव संजय गाते भाजपा जिल्हासचिव नितीन बडगे, पं.स सदस्य दिलीप अग्रवाल, प्रवीण नांदे, नायब तहसीलदार उल्हास राठोड, नगर सेवक जयभारत कांबळे आदी उपस्थित होते.
 

Web Title: MPs knew water scarcity problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.