कालव्याच्या पुलाला लिकेज, पांदण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:26 PM2017-11-06T23:26:18+5:302017-11-06T23:26:39+5:30
देवळी तालुक्यातील जामणी (चिकणी) येथे जामणी ते सोनेगाव (आबाजी) पांदण रस्ता आहे. याच रस्त्याने जामणी येथील शेतकरी वहिवाट करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : देवळी तालुक्यातील जामणी (चिकणी) येथे जामणी ते सोनेगाव (आबाजी) पांदण रस्ता आहे. याच रस्त्याने जामणी येथील शेतकरी वहिवाट करतात. या रस्त्यावर कालव्याचा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाला लिकेज असल्याने रस्त्याची दयनिय अवस्था असून चिखल झाला आहे. परिणामी, शेतकरी, शेतमजुरांची वहिवाट धोक्यात आली आहे.
शासनाला जलयुक्त शिवार अभियान राबविताना काही प्रमाणात यश आले; पण बºयाच ठिकाणी ही कामे नुकसानदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. जामणी येथील ४० ते ५० शेतकºयांची १००-१२५ एकर जमीन जामणी-सोनेगाव मार्गावर आहे. याच पांदण रस्त्यावरून कालवा गेला आहे. पांदण रस्त्यावर कालव्याचे पाणी वाहून नेण्याकरिता पूल बांधण्यात आला; पण हा पूल निकृष्ट दर्जाचा बांधल्याचा आरोप जामणी येथील शेतकरी व ग्रामस्थ करीत आहे. परिणामी, दोन वर्षांत हा पूल लिक झाला आहे. सदर पुलाला मोठे लिकेज असल्याने पाणी पांदण रस्त्यावर साचत आहे. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून चिखल साचला आहे. सध्या शेतात कापूस वेचणी सुरू असून तो घरी आणायचा झाल्यास बैलबंडी वा अन्य वाहनांचा वापर करावा लागतो; पण या मार्गाने बंडी जातच नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शेतमाल घरी आणणे जिकिरीचे
सध्या शेतातील कापूस घरी आणण्यासाठी शेतकºयांना कसरत करावी लागत आहे. यासाठी रस्ते गरजेचे आहे; पण जामणी येथील पांदण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे शेतमाली घरी आणणे शेतकºयांना जिकिरीचे झाले आहे.