हत्या प्रकरणात प्रियकराला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:31 AM2017-11-09T00:31:44+5:302017-11-09T00:32:00+5:30

प्रेयसीला हॉटेलमध्ये आणून रात्रीच्या सुमरास तिची हत्या करणाºया प्रियकराला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

In the murder case, lover's life imprisonment | हत्या प्रकरणात प्रियकराला जन्मठेप

हत्या प्रकरणात प्रियकराला जन्मठेप

Next
ठळक मुद्देहॉटेल गुलशनमधील घटना : जिल्हा सत्र न्यायाधीशांचा निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रेयसीला हॉटेलमध्ये आणून रात्रीच्या सुमरास तिची हत्या करणाºया प्रियकराला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या रायकर यांनी बुधवारी हा निर्वाळा दिला. रूपेश दामोधर तिडके (३५) रा. गोदणी (रेल्वे) नागपूर, असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने हॉटेल व्यावसायिक धास्तावले होते तथा नागरिकांतही खळबळ माजली होती, हे विशेष!
रूपेश तिडके रा. गोदणी रेल्वे नागपूर हा प्रेयसी प्रीती फुलन पांडे हिच्यासह शहरातील हॉटेल गुलशन येथील खोली क्र. २०५ मध्ये १८ जानेवारी २०१५ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता थांबले होते. रूपेश लॅपटॉप दुरूस्तीला जातो, असे सांगून १९ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ११ वाजता निघून गेला. त्याच दिवशी रात्री हॉटेलच्या वेटरने खोलीजवळ जाऊन कॉलबेल वाजविले. दार ठोठावले; पण प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत दार उघडले असता प्रीती मृतावस्थेत दिसून आली. तिच्या अंगावर ब्लँकेट टाकून होते. आरोपी प्रीतीची हत्या करून पळून गेला होता. यानंतर तब्बल दीड महिन्यांनी म्हणजे ८ मार्च २०१५ रोजी पाचपावली पोलीस नागपूर यांनी त्याला अटक करीत वर्धा पोलिसांच्या स्वाधीन केले.
तपासांती प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. शासनातर्फे सरकारी अभियोक्ता गिरीश तकवाले यांनी १४ साक्षीदार जिल्हा न्यायाधीश चांदेकर यांच्या समक्ष तपासले. त्यांची बदली झाल्याने प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायकर यांच्याकडे वर्ग झाले. त्याच्या समक्ष प्रकरणात युक्तीवाद झाला. साक्षपुरावे व युक्तीवाद ऐकल्यानंतर तथा प्रत्यक्ष साक्षदार, हस्ताक्षर तज्ञांचे अहवाल व इतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायकर यांनी आरोपीला शिक्षा सुनावली. यात भादंविच्या कलम ३०२ अन्वये आजन्म कारावास व ५००० रुपये दंड तथा दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी नरेंद्र भगत व संजय डगवार यांनी सहकार्य केले.

Web Title: In the murder case, lover's life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.