रस्ते दुरुस्तीसाठी प्रहारकडून मुरुमाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:38 PM2017-09-18T23:38:10+5:302017-09-18T23:38:31+5:30
शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आणून देण्यासाठी प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळा जगताप यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरूस्त करून द्यावे, यासाठी चक्क गिट्टी, मुरूम भरलेले टोपले निवेदनासोबत दिले. प्रहारचे जगताप यांनी अचानक सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यलयात जाऊन ही भेट दिल्याने अधिकारी, कर्मचाºयांची भंबेरी उडाली.
शहराला जोडणाºया रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आर्वी लगतच्या २० किमी अंतरावर दररोज अनेकांना कामानिमित्त ये-जा करावी लागते. हे खड्डे रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने अपघात होतात. खड्ड्यांमुळे अपघाताची संख्याही वाढली आहे. यामुळे बांधकाम विभाग मरण्याची तर वाट पाहत नाही ना, असे म्हणत प्रहारने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यलय गाठले. यावेळी खड्डे बुजविण्याच्या मागण्यांसह मुरूम व गिट्टी भेट देत निद्रीस्त असलेल्या विभागाला जागं करण्याचे काम केले. येत्या तीन दिवसांत ई-टेंडर प्रक्रिया पार पडली नाही तर रस्त्याची डागडुजी ही मुरूम टाकून करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी प्रहारचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनात सुधीर जाचक, गुड्डू पठाण, जुनेद सय्यद, मुकेश मस्के, माणिक नीमकर, विकास दमाये, राजू नांदूरकर, संजय कुरील, विक्रम भगत, राजीक कुरेशी, अंकुश गोटे, प्रणव गोवाड, कलीम भाई, फारुख खान यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.