संगीताची नियमित साधना करणे गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:34 AM2018-03-10T00:34:20+5:302018-03-10T00:34:20+5:30
नव्या पिढीतही विविध संगीत लोकप्रिय होत आहे. संगीत शिकणाºयांना संगीतात तल्लीन व्हावे लागेल. इतकेच नव्हे तर विविध प्रकारचे संगीत शिकणाºयांनी नियमित संगीताची साधना करणे गरजेचे आहे, .....
ऑनलाईन लोकमत
वर्धा : नव्या पिढीतही विविध संगीत लोकप्रिय होत आहे. संगीत शिकणाºयांना संगीतात तल्लीन व्हावे लागेल. इतकेच नव्हे तर विविध प्रकारचे संगीत शिकणाºयांनी नियमित संगीताची साधना करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संगीतकार उषा खन्ना यांनी केले.
जिंदगी प्यार का गीत है.... स्वर-स्वाज जोपासणारी संगीतकार उषा खन्ना यांची एकापेक्षा एक गीतांचे रंगतदार मैफल स्थानिक अग्निहोत्री कॉलेज येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री, शिवकुमारी अग्निहोत्री, डॉ. पूनम वर्मा, ज्योती भगत, मोहन अग्रवाल, शशिकांत बागडदे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान शंकरप्रसाद अग्निहोत्री व शिवकुमारी अग्निहोत्री यांच्या हस्ते उषा खन्ना यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तर उषा खन्ना यांच्या हस्ते उल्लेखनिय कार्य करणाऱ्य डॉ. पूनम वर्मा शिवकुमार व ज्योती भगत यांचा सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना डॉ. मनोज साल्पेकर यांनी उषा खन्ना यांचा ५५ वर्षांचा सांगितिक प्रवासाबद्दल माहिती दिली.
उषा खन्ना यांनी नौशाद, शंकर जयकिशन, मदन मोहन या संगीतकारांचा सुवर्णकाळ ऐनभरात असताना आपण संगीतबद्ध केलेला दिल दे के देखो या चित्रपटातून सुरवात केल्याचे सांगितले. चांद को क्या मालूम..., अजनबी कौन हो तुम..., दिल के टुकडे, टुकडे करके, मुस्कुरा के चल दिये... मधूबन खुशबू देता हैं... शायद मेरी शादी का खयाल... अशी एकापेक्षा एक गीत यावेळी सादर करण्यात आले. ज्योतीरमण अय्यर, मनीषा लताड, आकांक्षा, अरविंद पाटील, उन्नीकृष्णन् नायर, संजय पोटदुखे, अवंतिका ढूमने व शशिकांत बागडदे यांच्या गीतांनी उपस्थित भारावून गेले होते. कार्यक्रमाला वर्धा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उयशस्वीतेकरिता संस्थेच्या शिक्षकांंनी सहकार्य केले.