अबब! साडेदहा फुटाच्या अजगराने गिळले अख्खे कुत्रे; सर्पमित्रांनी दिले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:29 PM2020-07-14T12:29:36+5:302020-07-14T12:30:20+5:30
जिल्ह्यात गिरडला लागून असलेल्या फरीदपुर गावा लगतच्या जनावरे चारण्याच्या पडिक शिवारात सायंकाळच्या सुमारास अजगर हा साप जाताना असताना आढळून आला .
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: आजही सापाला आपण वैरी समजतो . परंतु साप हा शेतकऱ्यांसाठी हितकारक समजला जातो . जिल्ह्यात गिरडला लागून असलेल्या फरीदपुर गावा लगतच्या जनावरे चारण्याच्या पडिक शिवारात सायंकाळच्या सुमारास अजगर हा साप जाताना असताना आढळून आला . अजगराने काही तरी गिळंकृत केल असल्याने तो पूर्णपणे फुगला होता. एका शेतकऱ्याने त्याला पाहिले व शेतकऱ्याची भंबेरीच उडाली. त्याने या घटनेची माहिती गावांतील युवकांना कळवली. लगेच गिरड येथील सर्पमित्रांना घटनास्थळी बोलविण्यात आले .
सर्पमित्रांनी मोठया शितफीने सापाला कोणतीही इजा होऊ न देता त्याला पकडले . अजगराने काहीतरी गिळंकृत केल असल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या. काही वेळातच सापाच्या तोंडातून भला मोठा कुत्रा मरणासन्न अवस्थेत बाहेर पडला . लगेच ही माहिती सर्पमित्र प्रकाश लोहट , रवि वरघणे , स्वराज वरघणे , रोशन नौकरकर , राकेश बोबडे यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली . गिरड क्षेत्राचे वनाधिकारी एन एस नरडंगे यांनी अजगराची नोंद केली . वनविभागाने सर्पमित्रांना सोबत घेऊन अजगराला मोहंगाव जंगलात सोडून जीवनदान देण्यात आले . साप दिसल्यास सापाला कोणतीही इजा न करता सर्पमित्राना माहिती देण्याचे आवाहन सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष रवि वरघणे यांनी केले.