नाफेड सोयाबीन, मूगाची हमी भावाने करणार खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 05:07 PM2024-10-07T17:07:15+5:302024-10-07T17:07:47+5:30

नोंदणीस सुरुवात : आर्वीत १० ऑक्टोबरपासून खरेदी प्रारंभ होणार

Nafed will buy soybeans, groundnuts at guaranteed prices | नाफेड सोयाबीन, मूगाची हमी भावाने करणार खरेदी

Nafed will buy soybeans, groundnuts at guaranteed prices

लोकमत न्यूज नेटवर्क 
आर्वी :
यंदा मूग, उडीद आणि सोयाबीनची नाफेडद्वारा खरेदी होणार आहेत. यामध्ये मूग व उडदाची  १ ऑक्टोबरपासून नोंदणी, तर १० ऑक्टोबरपासून हमीभावाने प्रत्यक्ष खरेदी व सोयाबीन १५ ऑक्टोबरपासून खरेदी होणार आहे.


शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यंदाच्या चालू हंगामात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ नाफेडद्वारा मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करणार आहेत. या अनुषंगाने तातडीने प्रस्ताव मागितले आहेत. १० ऑक्टोबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ पर्यंत खरेदी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सोयाबीनची १२ जानेवारी २०२५ दरम्यान ही खरेदी होणार आहे. 


राजकीय पोळी शेकन्यासाठी वापर
शेतकरी आपल्या मालाची किंमत ठरवू शकत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असेल, तर सोयाबीनला सहा ते सात हजार, कपाशीला दहा ते अकरा हजार आणि तुरीला आठ ते दहा हजार, मुगाला दहा ते बारा हजार, उडिदाला नऊ ते अकरा हजार हमीभाव मिळाला पाहिजे. त्यासाठी शासनाने, समाजातील कार्यकर्ते, उच्चभ्रू लोकांनी, राजकीय पक्षाच्या सर्वच नेत्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. केवळ राजकीय पोळी शेकण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर सत्ताधारी व विरोधी पक्षांनी करू नयेत, अशी भावना शेतकरी अनुप जयसिंगपुरे यांनी व्यक्त केली. 


वर्षभरापासून दलालांकडून आर्थिक लूट 
वर्षभरापासून सोयाबीनला अपेक्षित असा आणि पाहिजे तसा हमीभाव मिळाला नाही. गतवर्षी खासगीत व एम-एसपीमध्ये फारसा फरक नसल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीन विकले नाहीत. त्यानंतर सोयाबीनचे दर ४००० हजार रुपये क्विंटलदरम्यान स्थिरावले होते. आता मात्र तेलाचे आयात शुल्क २० टक्के केल्यानंतर सोयाबीन ४७०० ते ४९०० रुपयांपर्यंत पोहोचले. आठवड्याभरात नवे सोयाबीन बाजारात आल्यानंतर भाव पुन्हा पाडण्यात येऊन सोयाबीनचे भाव पुन्हा ४००० ते ४३०० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.


यंदाचे हमीभाव शेतमाल              हमीभाव प्रती क्विंटल
मूग                                                  ८,६८२ 
उडीद                                               ७,४०० 
सोयाबीन                                           ४,८९२

Web Title: Nafed will buy soybeans, groundnuts at guaranteed prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.