नगरपंचायती वेटिंगवर ; ग्रामपंचायतींनी उधळला गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 05:00 AM2021-12-23T05:00:00+5:302021-12-23T05:00:48+5:30

वर्धा लगतच्या आलोडी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ५ मधील एका जागेकरिता पोट निवडणूक घेण्यात आली. यात आमदार डॉ. पंकज भोयर समर्थित सरपंच गटाचे प्रवीण नागोसे यांनी ४४३ मते घेऊन विजय मिळविला. त्यांनी कॉंग्रेस समर्थित आकाश बुचे यांचा पराभव केला. सरपंच अजय जानवे आणि उपसरपंच बादल विरुटकर यांच्या नेतृत्वात हा विजय मिळविता आला.

On Nagar Panchayat Waiting; The gram panchayat wasted no time | नगरपंचायती वेटिंगवर ; ग्रामपंचायतींनी उधळला गुलाल

नगरपंचायती वेटिंगवर ; ग्रामपंचायतींनी उधळला गुलाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील कारंजा, आष्टी, सेलू व समुद्रपूर या चार नगरपंचायतीमधील ५४ जागांकरिता सार्वत्रिक तर ६३ ग्रामपंचायतीमधील ८४ जागांकरिता २१ डिसेंबरला एकाच दिवशी मतोत्सव पार पडला. नगरपंचायतीमधील मागास प्रवर्गाच्या जागा रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातून सदस्य निवडण्याकरिता १८ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यामुळे २१ डिसेंबरला झालेले मतदार आणि १८ जानेवारीला होणारे मतदान याचा निकाल १९ जानेवारीला जाहीर होणार असल्याने नगरपंचायतींमधील सदस्यांना तोपर्यंत ‘ वेट ॲण्ड वॉच ’ ची भूमिका घ्यावी लागणार आहे. पण, ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी निकाल जाहीर झाल्याने ग्रामपंचायत परिसरात गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला.

आलोडीत भाजप समर्थित सरपंच गटाचा विजय
वर्धा लगतच्या आलोडी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ५ मधील एका जागेकरिता पोट निवडणूक घेण्यात आली. यात आमदार डॉ. पंकज भोयर समर्थित सरपंच गटाचे प्रवीण नागोसे यांनी ४४३ मते घेऊन विजय मिळविला. त्यांनी कॉंग्रेस समर्थित आकाश बुचे यांचा पराभव केला. सरपंच अजय जानवे आणि उपसरपंच बादल विरुटकर यांच्या नेतृत्वात हा विजय मिळविता आला. माजी सरपंच प्रीती देशमुख, सदस्य गौरव गावंडे, पार्बता रहांगडाले, विद्या किन्हेकर, कल्पना वाटकर यांच्यासह सर्व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.

सेलडोहमध्ये सोनटक्के विजयी
सेलू : तालुक्यातील सेलडोह ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमधील रिक्त जागेकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत नामदेव सोनटक्के यांनी भाजपचे रजत अंबाडाळे यांच्यावर १०७ मतांनी मात करुन विजय मिळवला. दोन गटांत झालेल्या थेट लढतीत केशरीचंद खंगार गटाचे प्रशांत सोनटक्के विजयी झाले. सोनटक्के यांना २२९ तर अंबाडाळे यांना १२२ मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून नितीन बेताल यांनी काम पाहिले.
 

माणिकवाडात काँग्रेसचे शिंगारे विजयी

तारासावंगा :  माणिकवाडा ग्रा.पं. मधील वाॅर्ड क्रमांक २ मधील एका सदस्यासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस समर्थित पंजाबराव शिंगारे यांना एकूण  २०५ मते तर, भाजपाचे जयप्रकाश सनेसर यांना १७७ मते मिळाली. शिंगारे यांचा २८ मतांनी विजय झाला. चुरशीच्या झालेल्या या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा विजय झाल्याने ग्रामपंचायत माणिकवाडा येथे  आता काँग्रेसचे ६ तर, भाजपाचे ४ सदस्य आहेत. सरपंच मात्र भाजपाचे आहे. पंजाबराव शिंगारे यांच्या विजयाबद्दल माणिकवाडा येथील काँग्रेसचे केशवराव ढोले, माधव माणमोडे, अंकित कावळे, रामभाऊ बारंगे, बाबूलाल भादा, ओंकार खवशी, धनराज कातडे, मंगेश शिंगारे, मोहन कावळे, पंढरी खाडे यांनी मोलाची भूमिका बजावली.

कारंजा तालुक्यात आठ ग्रा.पं.चा लागला निकाल
कारंजा (घा.) : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. चिंचोली ग्रामपंचायतीमध्ये मनोहर रुपचंद डोंगरे, शेलगाव (लवणे) येथे गौरव चंद्रभान हिंगवे, आजनादेवी येथे लक्ष्मण बाबुराव देवासे, जऊरवाडा (खैरी) येथे रोशन सुखदेव कुंमरे हे विजयी झाले. लादगड येथील ३, सिंदीविहिरी १, सावल १ व चोपन १ अशा सहा जागांकरिता उमेदवारी अर्जच आले नसल्याने निवडणूक झाली नाही. धावस (बु.) आणि धर्ती येथील प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. तर ४ जागांकरिता निवडणूक प्रक्रिया पार पडली. खैरी पुनर्वसन येथील ग्रासम्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली होती. पण, ती पूर्णत्वास गेली नसल्याने येथील ग्रामस्थांनी एकीचा परिचय देत ‘नोटा’ला पसंती दिली.

आर्वी तालुक्यात चार भाजपकडे तर तीन काँग्रेसकडे

-  देऊरवाडा/आर्वी: तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी झालेल्या पोट निवडणुकीत १५ उमेदवार रिंगणात होते. या सात जागांपैकी चार जागा भाजप समर्थित तर तीन जागांवर काँग्रेस समर्थित उमेदवार निवडून आले. बेनोडा ग्रा. पं. च्या वॉर्ड क्रमांक २ मधून मीना होरेश्वर मेश्राम, देऊरवाडा वॉर्ड क्रमांक ३ मधून वैशाली सतीश खडसे तर वर्धमनेरीतील वॉर्ड क्रमांक १ मधून विक्की श्रावण मसराम हे तिघे काँग्रेस समर्थित उमेदवार निवडून आले. 

-  तर काचनूर येथील वॉर्ड क्रमांक १ मधून पुणाजी ओंकार भलावी व नितीन रमेश देऊळकर तर प्रभाग क्रमांक २ मधून प्रशांत गणपत घाटेवाड व नम्रता संजय अंभोरे हे निवडून आले. हे चारही सदस्य भाजप समर्थित आहेत. 

टेंभा ग्रामपंचायतीमध्ये भाजपवर ‘प्रहार’
हिंगणघाट : तालुक्यातील टेंभा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रंजित गराड यांनी भाजप समर्थित सरपंच गटाचे अमोल उमाटे यांचा २५ मतांनी पराभव केला. यात रंजित गराड यांना १४९ मते तर अमोल उमाटे यांना ११९ मते मिळाली.

कवठा ग्रा.प.मध्ये काँग्रेसचे वर्चस्व
पुलगाव : नजीकच्या कवठा (रेल्वे) येथील ग्रामपंचायतच्या पोट निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे उमेदवार अंकुश मडावी ७१ मतांनी निवडून आले. आमदार रणजीत कांबळे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवून अंकुश मडावी यांनी पुन्हा विजयाची परंपरा कायम ठेवली. विजयाबद्दल आ. कांबळे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, माजी पंचायत समिती सभापती मनोज वसू, माजी सरपंच नागोराव महल्ले, चंदू कांबळे, जय महल्ले, पुरुषोत्तम राऊत, कैलास मडावी, नितीन राऊत आदींनी आनंद व्यक्त केला.

 

Web Title: On Nagar Panchayat Waiting; The gram panchayat wasted no time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.