नालवाडी-म्हसाळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:32 PM2019-07-15T22:32:28+5:302019-07-15T22:33:03+5:30
माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या नालवाडी-म्हसाळा भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. म्हसाळा व नालवाडीवासीयांच्यावतीने आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या नालवाडी-म्हसाळा भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. म्हसाळा व नालवाडीवासीयांच्यावतीने आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
नालवाडी-म्हसाळा जि.प. सर्कलच्यावतीने ना. सुधीर मुनगंटीवार यांचा ग्रामपंचायत प्रांगणात भव्य नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नालवाडी-म्हसाळा जिल्हा परिषद सर्कल मधील ११ कोटी रुपयाच्या विविध विकासकामाचा श्रीगणेशा आणि लोकार्पण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाय त्यांच्याच हस्ते भाजप सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्याला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. व्यासपीठावर खा. रामदासजी तडस, आ. डॉ. पंकज भोयर, गुंडु कावळे, प्रशांत इंगळे तिगावकर, जि.प. सदस्य नूतन राऊत, म्हसाळाचे सरपंच संदीप पाटील, नालवाडीच्या सरपंच प्रतिभा बाळा माऊस्कर, महिला भाजप आघाडीच्या अध्यक्ष अर्चना वानखेडे, सुनील गफाट, पत्रकार विनोद राऊत आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रमोद राऊत यांनी केले. संचालन प्रा. सचिन पेठारे यांनी केले. कार्यक्रमाला विवेक गवते, निखिल भानसे, सूरज काटोरे, बादल शेळके, स्वप्नील गोटे, योगेश गवते, हर्षल पचारे, नितीन वासनिक, कांबळे यांनी सहकार्य केले.
मुनगंटीवार यांच्यामुळे दुसऱ्यांदा संधी- तडस
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे मला दुसऱ्यांदा खासदारपदाची संधी मिळाली. केवळ सुधीरभाऊ यांच्यामुळे वर्धा जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास झाल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी याप्रसंगी केले. यावेळी आ. भोयर यांनीही मनोगत व्यक्त केले.
नवनिर्वाचितांचाही झाला गौरव
कार्यक्रमादरम्यान नव्याने भाजपमध्ये प्रवेश करणाºयांसह म्हसाळ्याचे सरपंच संदीप पाटील, नालवाडीच्या सरपंच प्रतिभा माऊस्कर यांचा ना. मुनगंटीवार आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.