लँड पुलिंगच्या नावाखाली इंचभरही जमीन देणार नाही

By admin | Published: September 17, 2016 02:22 AM2016-09-17T02:22:05+5:302016-09-17T02:22:05+5:30

शासनाच्यावतीने नागपूर-मुंबई सुपर हायवेच्या नावाखाली कोणताही मोबदला न देता शेतकऱ्यांची जमीन लँड पुलिंगच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

In the name of Land Pulling it will not have even one inch of land | लँड पुलिंगच्या नावाखाली इंचभरही जमीन देणार नाही

लँड पुलिंगच्या नावाखाली इंचभरही जमीन देणार नाही

Next

महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
वर्धा : शासनाच्यावतीने नागपूर-मुंबई सुपर हायवेच्या नावाखाली कोणताही मोबदला न देता शेतकऱ्यांची जमीन लँड पुलिंगच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ज्या भागातून हा रस्ता जाणार आहे, त्या भागातील शेतकऱ्यांची यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होणार आहे. ही फसवणूक टाळण्याकरिता लँड पुलिंगच्या नागवाखाली इंचभरही जमीन देणार नाही, असा इशारा महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनादरम्यान दिला.
नागपूर-मुंबई दरम्यान दोन महामार्ग आहेत. अशातच नागपूर-मुंबई दरम्यान काही वर्षांपूर्वीच तयार झालेला आहे. या मार्गाचा आठ पदरी महामार्ग करण्याची तरतूद असताना हा तिसरा महामार्ग करून स्मार्ट सिटीच्या नावे शेतकऱ्यांची ५२ हजार एकर जमीन लुटण्याची काय गरज, असा सवाल समता परिषदेने उपस्थित केला. शेतकऱ्याला कवडीचाही मोबदला न देता केवळ दहा वर्षांनंतरची दिवास्वप्ने दाखवून त्याच्या जमिनी हडपणे हे कायद्याच्या विरोधात आहे. या धरणे आंदोलनात शेतजमिनी जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेतला होता. धरणे आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.

समता परिषदेचे धरणे
वर्धा : या धरणे आंदोलनात महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ पिसे, विजय मुळे, निळकंठ राऊत, सुधीर पांगुळ, कविता मुंगले, विद्या बहेकार, भरत चौधरी, संजय म्हस्के, शैलेश येळणे, जयंत भालेराव, केशव तितरे, जितेंद्र गोरडे, शंकर येलोरे, मनोज पिपंळे, रणजित देशमुख, राजू उडाण, बाबा भारती, प्रशांत लोणकर, सखुबाई येलोरे, आनंद पवार अशोक वैरागडे, राजेंद्र झिले, संगम मुंजेवार, कवडु बुरंगे, गजानन किनगावकर, श्रावण भांडेकर, प्रशांत घोंगडे, सीता घोंगडे, संजय देशमुख, पप्पु सालंकार, विनोद पारिसे, आनंद कठाणे, नागपूर-मुंबई हायवे बाधित शेतकरी व महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: In the name of Land Pulling it will not have even one inch of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.