‘मेडीकल कंसल्टेशन चार्ज’च्या नावावर आर्थिक पिळवणूक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:00 AM2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:15+5:30
डॉक्टर किती प्रसिद्ध त्यानुसार त्या डॉक्टराची सदर फी ठरत असून रुग्णाने आजाराबाबत अधिक विचारणा केल्यावर वैद्यकीय अनेक खासगी डॉक्टरांकडून उडवा-उडवीची आणि असमाधानकारक उत्तरे दिली जात असल्याचे बघावयास मिळते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सध्या डेंग्यू, मलेरिया या किटकजन्य आजारांसह व्हायरल ताप, स्क्रप टायफस आदी आजार डोके वर काढू पाहत आहे. परंतु, ‘मेडीकल कंसल्टेशन चार्ज’च्या नावाखाली अनेक खासगी डॉक्टर रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून मनमर्जी फी उकळत असल्याचे दिसून येते. डॉक्टर किती प्रसिद्ध त्यानुसार त्या डॉक्टराची सदर फी ठरत असून रुग्णाने आजाराबाबत अधिक विचारणा केल्यावर वैद्यकीय अनेक खासगी डॉक्टरांकडून उडवा-उडवीची आणि असमाधानकारक उत्तरे दिली जात असल्याचे बघावयास मिळते. मेडीकल कंसल्टेशनच्या नावाखाली सध्या रुग्णांसह रुग्णांच्या कुटुंबीयांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
वर्धा जिल्ह्यात ४३ मॅटनिटी रुग्णालय, ५ नेत्र खासगी रुग्णालय, एक कॅन्सर खासगी रुग्णालय, ५ आर्थाे खासगी रुग्णालय, तीन बालरोग खासगी रुग्णालय, २६ इतर खासगी रुग्णालये असल्याचे नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. पूर्वी नाममात्र खासगी रुग्णालये जिल्ह्यात होते तर सध्या दिवसेंदिवस जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. इंडियम मेडीकल कॉन्सीलच्या नियमानुसार प्रत्येक खासगी डॉक्टरांच्या रुग्णालयात त्या डॉक्टराची वैद्यकीय सल्लामसलत (मेडीकल कंसल्टेशन) शुल्क किती याबाबतचा फलक असणे क्रमप्राप्त आहे. परंतु, काही बोटावर मोजण्या इतक्याच खासगी डॉक्टरांच्या रुग्णालयात हा नियम पाळल्या जात असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर एकसारखे शिक्षण घेतलेल्या खासगी डॉक्टरांपैकी एक डॉक्टर १०० रुपये तर दुसरा खासगी डॉक्टर वैद्यकीय सल्ला मसलतच्या नावाखाली रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून ३०० ते ४०० रुपये उकळत असल्याने हा प्रकार रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाराच ठरत असून कुठलीही पावती खासगी डॉक्टर देत नाहीत.
समाधान महत्त्वाचे
मेडीकल कन्सल्टेशनच्या नावाखाली शुल्क घेणाऱ्या खासगी डॉक्टराने रुग्णाला असलेल्या आजाराबाबत रुग्णासह त्यांच्या कुटुंबीयांना योग्य सल्ला देणे क्रमप्राप्त आहे. शिवाय त्यांचे समाधान करणेही महत्त्वाचे आहे. कुठलाही खासगी डॉक्टर उडवा-उडवीचे उत्तर देत असल्यास रुग्णासह त्याच्या नातेवाईकाला जिल्हा शल्य चिकित्सकाकडे लेखी तक्रार करता येते.
कुठल्या खासगी डॉक्टराने किती मेडीकल कन्सल्टेशन चार्ज घ्यावा हे अद्यापही निश्चित करण्यात आलेले नाही. परंतु, मेडीकल कन्सल्टेशन चार्ज घेणाºया वैद्यकीय अधिकाºयाने रुग्णाचे समाधान करणे गरजेचे आहे. मेडीकल कन्सल्टेशन चार्ज आणि इतर विषयाला अनुसरून प्रभावी नियमावली तयार करण्याचा विषय शासनाकडे विचाराधीन आहे.
- पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक,
वर्धा.
शिक्षण जरी सारखे असले तरी एका खासगी डॉक्टर आणि दुसºया खासगी डॉक्टरांच्या मेडीकल कन्सल्टेशन चार्ज मध्ये तफावत आहे. इस्टॅब्लीस्ट कॉस्ट जास्त असल्याने ही तफावत दिसून येते. इतकेच नव्हे तर खासगी रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात कर लादण्यात आले आहे. गरीब व गरजू रुग्णांची समस्या लक्षात घेता शासनाने खासगी रुग्णालयांना सवलती दिल्या पाहिजे.
- संजय मोगरे, अध्यक्ष, आय. एम. ए., वर्धा.