वणा नदीच्या पुरामुळे नंदपूर गावाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:50 PM2018-07-06T23:50:07+5:302018-07-06T23:50:36+5:30
नंदपूर गाव वणा नदी आणि विदर्भ नाल्याने वेढले आहे. नदी आणि नाल्याचे पाणी वाढतीवर असल्याने पुराचा धोका वाढला आहे. अशी माहिती नंदपूरचे माजी ग्रा.पं.सदस्य आणि समुद्रपूर तालुका भाजप उपाध्यक्ष महेश हिवंज यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : नंदपूर गाव वणा नदी आणि विदर्भ नाल्याने वेढले आहे. नदी आणि नाल्याचे पाणी वाढतीवर असल्याने पुराचा धोका वाढला आहे. अशी माहिती नंदपूरचे माजी ग्रा.पं.सदस्य आणि समुद्रपूर तालुका भाजप उपाध्यक्ष महेश हिवंज यांनी दिली.
हमदापूरपासून अकरा कि.मी.अंतरावर भोसा पाटीपासून आतमध्ये हे गाव आहे. या गावाच्या एका बाजूला वना नदी तर मागच्या बाजूने विदर्भ नाला वाहतो. या दोन्हीचा चा संगम गावाच्या मागच्या भागात झालेला आहे.
पावसाला गुरूवारला सायंकाळी सुरूवात झाली असली तरी सकाळपासून जोरदार पावसाने मात्र नदी, नाला दुथडी भरून वाहू लागला. पाणी पातळी वाढतच असल्याने गावकरी सतर्क झाले. गावाच्या खालच्या भागातील रहिवाशी यांनी धान्य, खते, महत्वाचे सामान ओळखीच्या घरी हलवायला सुरुवात केली आहे. गावातील नागरिक कामाला लागले असून साहित्य सुरक्षित ठिकाणी पोहचविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याचे हिवंज यांनी लोकमतला सांगितले. नंदपूरच्या पुरस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष असून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहे.
नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
शुक्रवारी सकाळपासून वर्धा जिल्ह्यात सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या तालुक्यातील नद्या नाले दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावात दंवडी देण्यात आली असून नदीकाठावर नागरिकांनी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहे. नागपूर जिल्ह्यातील वडगाव आणि नांद येथून पाणी सोडण्यात आल्याने वणा नदीची पातळी वाढत आहे.