नराधम बापास दहा वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:40 PM2019-07-16T22:40:19+5:302019-07-16T22:40:40+5:30

अल्पयीन मुलीवर बलात्कार करण्याऱ्या नराधम बापास भादंविच्या कलम ३७६ (२) (एन.) (आय.) व कलम ५ (एन) तसेच पोस्कोच्या कलम ६ नुसार दहा वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याच्या साध्या कारावासारी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Naradham Bapas Ten Years imprisonment | नराधम बापास दहा वर्षांचा कारावास

नराधम बापास दहा वर्षांचा कारावास

Next
ठळक मुद्देदंडही ठोठावला : विशेष सत्र न्यायाधीशांचा निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अल्पयीन मुलीवर बलात्कार करण्याऱ्या नराधम बापास भादंविच्या कलम ३७६ (२) (एन.) (आय.) व कलम ५ (एन) तसेच पोस्कोच्या कलम ६ नुसार दहा वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याच्या साध्या कारावासारी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल येथील विशेष सत्र न्यायाधीश मृद्रुला भाटिया यांनी दिला आहे. सदर शिक्षेस पात्र ठरलेला नराधम बाप देवळी तालुक्यातील आकोली परिसरातील रहिवासी आहे.
सविस्तर वृत्त असे की, १२ वर्षीय पीडिता ही तिच्या आई आणि वडिलासोबत राहत होती. पीडितेची आई रोजमजुरीचे काम करून घरातील कर्त्याला हातभार लावत. तर वडिलाला दारूपिण्याचे व्यसन आहे. याच व्यसनाच्या आहारी गेलेला पीडितेचा वडिल कुठलाही कामधंदा करीत नाही. घटनेच्या दिवशी पीडिता ही तिच्या आईसोबत पलंगावर झोपलेली होती. त्यावेळी तिचे वडिल घरी नव्हते. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास पीडिता ओरडत असल्याचे आणि तिचा आवाज पीडितेच्या आईला आल्याने तिने ऊठून पाहिले असता आपल्या पोटचा गोळा असलेल्या अल्पवयीन मुलीवर बापच अतिप्रसंग करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने पीडितेच्या आईने पीडितेची नराधम बापापासून सुटका केली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने या घटनेची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकीच पीडिता आणि तिच्या आईला दिली. नराधम बापाने दुसºयाही दिवशी पीडितेच्या आईला धाक दाखवून पीडितेवर अतिप्रसंग केला. हा प्रकार घृणास्पद वाटल्याने पीडितेच्या आईसह पीडितेने पीडितेच्या आजीकडे जाण्याचे पसंत केले. तेथे त्यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पुलगाव पोलिसांनीही तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. शिपणे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. शासकीय बाजू जिल्हा शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. जी. व्ही. तकलावे यांनी न्यायालयात मांडली. त्यांनी आठ साक्षदार तपासत युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि पुरावे लक्षात घेऊन विशेष सत्र न्यायाधीश मृद्रुला भाटीया यांनी हा निर्णय दिला आहे.
दोन्ही शिक्षा भोगणार एकत्रित
नराधम बापास ३७६ (२), (एन) (आय) भा.द.वि व कलम ५ (एन) व शिक्षेचे कलम ६ बा.लै.अ.प्र.कायदा या दोन्ही कलमा नुसार १० वर्षे सश्रम कारावास व ५०० रूपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. दोन्ही शिक्षा शिक्षेस पात्र ठरणारा आरोपी एकात्रित भोगणार असल्याचे न्यायालयीन सूत्रांनी सांगितले. पैरवी अधिकारी म्हणून पोहवा रिंगणे यांनी काम पाहिले.

Web Title: Naradham Bapas Ten Years imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.