यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्पाला राष्ट्रीय जल पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:10 PM2019-02-25T22:10:25+5:302019-02-25T22:10:38+5:30
भारत सरकारच्या जसंधारण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर जलसंधारण क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्राला दहा पुरस्कार जाहीर झाले. यात वर्धा जिल्ह्याला नदी पुनर्जीवन या गटातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि जलसंधारण क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधन, कल्पना व नवतंत्रज्ञाचा वापर यासाठी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सद्भावना ग्रामीण विकास संस्थेला जाहीर झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारत सरकारच्या जसंधारण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर जलसंधारण क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्राला दहा पुरस्कार जाहीर झाले. यात वर्धा जिल्ह्याला नदी पुनर्जीवन या गटातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि जलसंधारण क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधन, कल्पना व नवतंत्रज्ञाचा वापर यासाठी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सद्भावना ग्रामीण विकास संस्थेला जाहीर झाला. सदर पुरस्कार दिल्ली येथील कार्यक्रमात केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला असून तो वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वीकारला. सद्भावना ग्रामीण विकास संस्थेच्यावतीने जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने व मिलिंद भगत यांनी पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी केंद्रीय जलसंसाधन व नदी विकास, गंगा शुद्धीकरण खात्याचे राज्यमंत्री सावरलाल जाट यांची उपस्थिती होती. सद्भावना संस्थेने आलोडी-साटोडा परिसरात बांध तसेच बंधारे बांधून शेतीसाठी पाणीसाठा उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे.