कमळाचे फुल देवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसनी केला पेट्रोल दरवाढीचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 04:00 PM2018-05-23T16:00:57+5:302018-05-23T16:00:57+5:30
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात पेट्रोलपंप वरील वाहनचालकांना कमळाचे फुल देवून अभिनव पद्धतीने आंदोलन करून पेट्रोल दरवाढचा निषेध केला.
वर्धा - मागील काही दिवसापासून सातत्याने पेट्रोल व डिझेलमध्ये होणाºया दरवाढ सर्वसमान्यांच्या जिव्हारी लागली सून इंधन दरवाढ मुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे. तब्बल ८५.१८ रूपये व डिझेल ७१.६६ प्रतिलिंटर. पेट्रोलचे दर सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आंतर राष्ट्रीय बाजारपेठत तेलाच्या किंमती घसरल्या असताना मात्र पेट्रोल व डिझेल चढते दर आहेत. त्यतही महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त दर असल्याचे दिसून येते. या अनुषंगाने आज सकाळी १० वाजता बजाज चौक येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात पेट्रोलपंप वरील वाहनचालकांना कमळाचे फुल देवून अभिनव पद्धतीने आंदोलन करून पेट्रोल दरवाढचा निषेध केला. भाजपाला सत्येवर येण्याआधी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रती बॅलर ११० डॉलरपेक्षा जास्त भाव असताना देशात ७० रू. प्रति लिटर आणि ४५ रू. प्रति डिझल चालत नव्हते. त्याकरिता आंदोलन केले. ‘बहुत हो गई पेट्रोल और डिझेल की मार’ असे म्हणत सत्ता मिळविली आणि आता सत्येवर आल्यावर पेट्रोल व डिझलचे भाव आकाशाला भिडले आहेत. ८५.१८ पेट्रोल व ७१.६६ रू. डिझेलचे भाव म्हणजे पट (१४० टक्के) जास्त भावाने विक्री होत आहे. हे सरकार सर्वसामान्याच्या जीवावर उठले असून उद्योजकांचे ही साधणारे असल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप किटे म्हणाले तर कमळ फुल देवून पेट्रोल दर वाढीचा निषेध करताना नागरिक म्हणाले की मोदी सरकारने आमची फसवणूक केली असून सत्येवर आल्यास भ्रष्टाचार व महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते. चार वर्ष होवून सुद्धा काही कमी झाले नाही उलट प्रचंड महागाई वाढलेली आहे. हजारो कोटीचा भ्रष्टाचार ही प्रकरणे उघडकीस येत आहे. पेट्रोल भरणे आमच्या आवाक्याच्या बाहेर झाले असून मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया दिली तर पेट्रोल पंप चालक पेट्रोल व डिझेल दर वाढीवर म्हणाले की लिटर मागे मिळणारा नफा हा अत्यल्प असून सर्व कर हे राज्य व केंद्र शासनाला द्यावे लागतात. आंतरराष्ट्री बाजार पेठेत तेलाच्या दर वाढल्या तरच पेट्रोल व डिझल वाढत होते आणि झाले तर दर वाढ कमी होते. मात्र असे होताना दिसत नाही. उपलट भाव वाढतच आहे, असे विचित्र चित्र असल्याचे म्हणाले. य आंदोलनामध्ये समिर देशमुख, संदीप किटे, शरयु वांदीले, सोनल ठाकरे, अजय गौळकर, प्रफुल मोरे, संदेश किटे, अर्चित निघडे, विनय डाहाके, अंबादास वानखेडे, बाबाराव खाडे, टी.सी. राऊत, मधुकर टोणपे, उत्कर्ष देशमुख, विना दाते, कुमूद लाजुरकर, शारदा केने, दुर्गा धूरत, अर्चना मोरे, वंदना पेंदाम, राष्ट्रपाल गणविर, कवडु बुरंगे, महेश खंडारे, नयन खंगार, मंगेश गावंडे, मोहन काळे, मोहन हांडे, नितीन थुल, विक्की खडसे, पृथवी शिंदे, धरमदास वैरागडे, संजय मते, संजय नारसे, संकेत तळवेकर, संकेत निस्ताने विनय मुन, सुयोग बिरे, अमित तिवारी, प्रणय कदम, अक्षय नवघरे, धिरज देशमुख, प्रशांत ढगे, रुपेश नगराळे, प्रवीण बोकडे, मिथून भगत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.