गार्इंच्या संरक्षणातच राष्ट्राची प्रगती

By admin | Published: September 30, 2014 11:39 PM2014-09-30T23:39:19+5:302014-09-30T23:39:19+5:30

भारतीय संस्कृतीत अहिंसेला सर्वोच्च स्थान असून प्राण्यांच्या रक्षण व संवर्धनासाठी जागरूकपणे कार्य करतांनाच गाईसारख्या प्राण्यांची हत्या होवू नये, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी समाजासोबतच शासनाने

Nation's progress in cow protection | गार्इंच्या संरक्षणातच राष्ट्राची प्रगती

गार्इंच्या संरक्षणातच राष्ट्राची प्रगती

Next

मुनीश्री समतासागर यांचे प्रतिपादन : गोवंश संरक्षण व संवर्धनासाठी मूक मोर्चा
वर्धा : भारतीय संस्कृतीत अहिंसेला सर्वोच्च स्थान असून प्राण्यांच्या रक्षण व संवर्धनासाठी जागरूकपणे कार्य करतांनाच गाईसारख्या प्राण्यांची हत्या होवू नये, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी समाजासोबतच शासनाने कायदा करावा व गार्इंच्या संवर्धनाची हमी द्यावी, असे प्रतिपादन मुनीश्री समतासागर महाराज यांनी केले. गोमाता ही राष्ट्रमाता आहे, तिचे संरक्षण करा, यासाठी निघालेल्या अहिंसा, जनजागरण, मुकमोर्चाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अहिंसा, जनजागरण, मूक मोर्चाचे आयोजन सकल दिगंबर जैन समाज चार्तुमास सेवा समितीतर्फे तसेच स्थानिक सर्व संघटनातर्फे करण्यात आले होते. हा मूकमोर्चा मुनीश्री समतासागर महाराज, मुनीश्री अरहसागर महाराज व एलकश्री निश्चयसागर महाराज यांच्या आशीर्वादात निघाला. यावेळी भारतीय जैन संघटना अध्यक्ष वीरेंद्र भागवतकर, किरीट ओरा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुलचंद बडजाते, सयाजी महाराज, देवेंद्र बडजाते यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी गोवंश हत्या प्रतिबंध करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. अहिंसा, जनजागरण मुकमोर्चामध्ये वर्धा शहरासोबतच विदर्भातील तसेच मध्यप्रदेशातील असंख्य जैन बांधव सहभागी झाले होते.
मुनीश्री समतासागर महाराज यांनी संपूर्ण गोवंश हत्या करण्यावर बंदी लागावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. सर्वधर्म अहिंसेच्या मार्गावर जात असताना कुठल्याही प्राण्यांची हत्या करणे हे अहिंसेत बसत नाही. जगा आणि जगू द्या, या तत्त्वानुसार कुठल्याही प्राण्यांना इजा पोहचवली जावू नये, त्यांचे संवर्धन करणे हे राष्ट्राचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.
शेती पिकविली तर ती हिरवी होवू शकते. त्यामुळे देशवासियांना अन्नधान्य मिळू शकते; परंतु कत्तलखाने काढले तर त्याचा समाजावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. भारतामध्ये कत्तलखान्यांना परवानगी देवू नये यासाठी अहिंसेच्या मार्गाने विनंती करण्यासाठी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अहिंसेची ज्योत आणि हे अभियान समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे आवाहनही मुनीश्री समतासागर महाराज यांनी केले.
मूकमोर्चाला सर्कस ग्राऊंड येथून सुरुवात झाली. त्यानंतर अनेकांत स्वाध्याय मंदिर, सराफा लाईन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विसर्जित झाला. मूकमोर्चामध्ये हजारो जैन बांधव सहभागी होते.(प्रतिनिधी)

Web Title: Nation's progress in cow protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.