शेताला आले तलावाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:22 AM2019-08-02T00:22:53+5:302019-08-02T00:23:14+5:30
देवळी तालुक्यातील चिखली येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी अडविण्यात आल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. महसूल विभागाने शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, याबाबत देवळी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : देवळी तालुक्यातील चिखली येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी अडविण्यात आल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. महसूल विभागाने शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, याबाबत देवळी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कार्यवाहीकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.
देवळी तालुक्यातील चिखली येथील शेतकरी चंद्रशेखर महादेव थूल यांच्या शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यांचे मौजा चिखली येथे शेत सर्व्हे क्रमांक ३९७ असून यांच्या शेताच्या खालील बाजूस पूर्व दिशेने तक्रारकर्त्याचे शेत आहे.
२०१७ साली शेत दुरुस्ती योजनेअंतर्गत विकासाच्या बांध्या शेतामधून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकºयांच्या शेतातील पाणी हे सरळ बांधाने वाहून जात असे. तसेच कालव्यावर पुलाचेदेखील बांधकाम करण्यात आले होते.
मात्र, पूर्व दिशेने शेती असलेल्या शेतकºयाने कालव्याच्या पुलावर स्वखर्चाने मुरमाचा भरावा टाकला. परिणामी, पावसाळ्यातील येणारे पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी शेतातच साचून राहते. यामुळे शेतकºयाच्या शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. तसेच शेती व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. पुलावर टाकलेला भरावा त्वरित हटवावा व शेतात साचलेले पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी शेतकरी चंद्रशेखर थूल यांनी प्रशासनाकडे केली आहे.
पिके धोक्यात; नुकसान भरपाई देणार कोण?
सेवाग्राम - शेती जगण्याचे साधन असून वर्षभर शेतात राबून शेती पिकविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. पावसामुळे पिकांना उभारी मिळाली. मात्र, रस्त्याच्या कामामुळे बांधा बुजविण्यात आल्याने शेती जलमय झाल्याची माहिती चाणकी येथील अरविंद पन्नासे आणि श्रीकांत राऊत यांनी दिली. सेवाग्राम ते हमदापूर, पुढे काढळीपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. यात काही ठिकाणी दोन्ही बाजूने तर काही ठिकाणी एका बाजूने रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिवनगर ते हमदापूर या दरम्यान तीन ठिकाणी पुलाचे काम करण्यात आल्याने वाहनांकरिता सुविधेचे झालेले आहे. पण, रस्त्याच्या रूंदीकरणात मुरमाचा भराव देण्यात आला. यात चाणकी शिवारात रस्त्याच्या बाध्या चक्क बुजवून रस्ता वाढविण्यात आला. तर राऊत आणि पन्नासे यांच्या शेताजवळील पाटबंधारे विभागाचा ढोला मुरमाने बुजविण्यात आला. पाच दिवस सतत पाऊस झाल्याने पाण्याला पुढे जाण्यास वाटच मिळाली नसल्याने पºहाटी, सोयाबीन पीक असलेल्या शेताला तलावाचे स्वरूप आलेले आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी संतापले आहेत.