वितरिकेच्या पाण्यामुळे शेताला आले तळ्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 06:00 AM2020-02-22T06:00:00+5:302020-02-22T06:00:06+5:30

कोटंबा येथील शेतकऱ्यांना केळझर मुख्य वितरिकेतून रब्बीच्या पिकांना सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या बांधावरून गेलेल्या उपवितरिका बुजल्यामुळे कालव्याचे पाणी वितरिकेच्या बाहेर येत कोटंबा मौजातील शेतकऱ्यांच्या शेतात गेले व शेताला तळ्याचे स्वरूप आले. यात शेतकरी रमेश रामभाऊ घुमडे यांचे पाऊन एकर हरभरा पाण्याने खरडून निघाला.

The nature of the pond came to the field due to the distribution water | वितरिकेच्या पाण्यामुळे शेताला आले तळ्याचे स्वरूप

वितरिकेच्या पाण्यामुळे शेताला आले तळ्याचे स्वरूप

Next
ठळक मुद्देहरभरा पिकाचे नुकसान : पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : सिंचन विभागाच्या बांधापर्यंत जाणाऱ्या वितरिका बुजल्यामुळे केळझर मुख्य वितरीकेतून सोडलेले बोरधरणचे पाणी शेतकऱ्यांच्या हरभरा पिकात गेल्यामुळे हरबरा पीक वाहून गेले आहे. सिंचन विभागाच्या गलथान कारभारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी कोटंबा येथील शेतकरी रमेश रामभाऊ घुमडे यांनी केली आहे.
कोटंबा येथील शेतकऱ्यांना केळझर मुख्य वितरिकेतून रब्बीच्या पिकांना सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या बांधावरून गेलेल्या उपवितरिका बुजल्यामुळे कालव्याचे पाणी वितरिकेच्या बाहेर येत कोटंबा मौजातील शेतकऱ्यांच्या शेतात गेले व शेताला तळ्याचे स्वरूप आले. यात शेतकरी रमेश रामभाऊ घुमडे यांचे पाऊन एकर हरभरा पाण्याने खरडून निघाला. त्यासोबतच सतीश चंपत घुमडे, गंगाधर घुमडे, मारोतराव गुणाजी गाठे, चंपत गुणाजी गाठे, महेश बबन भावरकर यांचे एक ते दोन एकरापर्यंत हरबरा पिकाचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीस सिंचन विभाग कारणीभूत असून पाटचऱ्यांची वेळोवेळी साफसफाई केल्या जात नसल्याने त्या पूर्णत: बुजून नामशेष होत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आर्थिक मदत देण्याची मागणी आहे.

Web Title: The nature of the pond came to the field due to the distribution water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.