उभ्या पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:47 PM2019-07-14T23:47:52+5:302019-07-14T23:49:47+5:30

कधी नव्हे अशा भीषण जलसंकटाला यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना सामोरे जावे लागले. पाणी समस्येच्या झळा नागरिक सोसत असतानाच हवामान खात्याने सुरुवातीला दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

Nature's Wisdom on Rise Crops | उभ्या पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी

उभ्या पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी

Next
ठळक मुद्देबळीराजाच्या नजरा आकाशाकडेपाण्याअभावी करपतेय अंकुरलेले पीक

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कधी नव्हे अशा भीषण जलसंकटाला यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना सामोरे जावे लागले. पाणी समस्येच्या झळा नागरिक सोसत असतानाच हवामान खात्याने सुरुवातीला दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. पण जून महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसात प्रत्यक्षात वरुणराजा वर्धा जिल्ह्यात बरसला. जूनच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतजमीनही बºयापैकी भिजल्याने शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड केली. शिवाय अंकुरून पिकाची वाढही बºयापैकी झाली. परंतु, सध्या पाऊसच बेपत्ता झाल्याने सुमारे १५ दिवसांची ही रोपटी करपत आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात वर्धा जिल्ह्यातील ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड होईल, असा अंदाज होता. परंतु, पाऊस लांबल्याने जुलैच्या दुसºया आठवड्यापर्यंत ३ लाख ३ हजार ७७६.७ हेक्टर शेतजमिनीवर विविध पिकांची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. आतापर्यंत केवळ ७०.८७ टक्केच पेरणी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, पावसाने दडी मारल्याने ३ लाख ३ हजार ७७६.७ हेक्टर शेतजमिनीवर अंकुरलेले हे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी अंकुरलेले पीक वाचविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. दमदार पावसाअभावी शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकºयांनाही उभे पीक जगविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर कोरडवाहू शेतकºयांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. पाऊस आला म्हणून पेरणी केली. पुढेही पावसाचा जोर कायम राहील अशी अपेक्षा होती. परंतु, पाऊसच बेपत्ता झाल्याने उगवलेले पीकही हातचे जाईल, असे सिंचनाची सोय नसलेले शेतकरी सांगतात. सध्या जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे;पण पाहिजे तसा पाऊस बरसत नसल्याने शेतकºयांसह नागरिकांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. येत्या काही दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास संपूर्ण पीकच करपण्याची आणि खरीपात शेतजमिनी पडिक ठेवण्याची परिस्थिती शेतकºयांवर ओढावणार असल्याची शक्यता काही कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
ढगाळी वातावरण राहिल्यास रोपट्यांचे आयुष्य आठ दिवसांचे
पाऊस बेपत्ता झाला असला तरी सध्या वर्धा जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे. असेच वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास अंकुरलेले पीक जास्तीत जास्त आठ दिवस दमधरून राहिल. तर ऊन तापल्यास हे रोपटे अवघ्या तीन दिवसातच करपेल, असे कृषी तज्ज्ञांसह वयोवृद्ध शेतकºयांकडून सांगण्यात येते.
ठिबक सिंचन पद्धत ठरेल फायद्याची
दमदार पाऊस अद्याप वर्धा जिल्ह्यात झाला नसल्याने भूगर्भातील पाणी पातळीतही पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकºयांनी उपलब्ध कमी पाण्यात पीक जगविण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास ते फायद्याचे ठरेल, असे सांगण्यात येते.

Web Title: Nature's Wisdom on Rise Crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.