नवरगावचे होणार पुनर्वसन

By admin | Published: September 24, 2016 02:18 AM2016-09-24T02:18:22+5:302016-09-24T02:18:22+5:30

सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या नवरगाव या गावचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

Navegaon will be rehabilitated | नवरगावचे होणार पुनर्वसन

नवरगावचे होणार पुनर्वसन

Next

खडकी येथे २० एकर जागा : पुनर्वसित बाधितांना आमदारांच्या हस्ते धनादेश
वर्धा : सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या नवरगाव या गावचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या गावातील ज्यांचे पुनर्वन होणार आहे अशांना आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते धनादेशचे वितरण करण्यात आले.
बोर व्याघ्र प्रकल्पाचे नव्याने सिमांकन करण्यात आले आहे. न्यू बोर व जुना बोर मिळून नवीन व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला आहे. त्यासाठी शासनाने नव्याने जंगलव्याप्त जमीन व गावे अधिग्रहीन केली आहेत. नवरगाव व्याघ्र प्रकल्पाच्या मधोमध असल्याने गावाचे अधिग्रहण करण्यात येऊन खडकी येथे त्या गावाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. जमीन अधिग्रहण कायद्यांतर्गत येथील शेतकऱ्यांना चार पट मोबदला देण्यात येत आहे. यात प्रति एकर ७ लाख २० हजार रुपये याप्रमाणे मोबदला देण्यात येणार आहे. वनविभागाने प्रथमच पुनर्वसनासाठी स्वामालकीची खडकी येथील २० हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली आहे. पुनर्वसनात गाव सोडणाऱ्या नागरिकांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपवन संरक्षक दिगंबर पगार, सहायक वनसंरक्षक जी.पी. बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी न्यू बोर अभयारण्य जी.एफ. लुचे, वनपरिक्षेत्र अधिकारी गायनेर, वनपरिक्षेत्र अधिकारी बाडे, क्षेत्र सहायक फाटे, शिरपूरकर, सोडगीर, सरपंच गिता कडूकर, पं.स. सदस्य अशोक कलोडे, भारतीय जनता किसान मोर्चाचे अध्यक्ष विलास बरटकर, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अशोक रतनवार, माजी जि.प. सदस्य साहेबराव उईके, मनीष बोपचे, ग्रामसेवक सुहास लंगडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Navegaon will be rehabilitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.