ग्रामीण रुग्णालयात एनसीडी युनिट आॅक्सिजनवर
By admin | Published: September 5, 2015 02:04 AM2015-09-05T02:04:59+5:302015-09-05T02:04:59+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम विभाग आॅक्सीजनवर आला आाहे.
रुग्णांची हेळसांड : रुग्णालयातकर्मचाऱ्यांचा अभाव
सेलू : येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम विभाग आॅक्सीजनवर आला आाहे. कंत्राटी पद्धतीवर असलेल्या या युनिटची कर्मचाऱ्यांअभावी दैनावस्था झाली आहे. मधुमेह आणि उच्चरक्तदाबांच्या रुग्णाला सेवा पुरविणारा हा विभाग सेलूतच नव्हेतर इतरही ठिकाणी शासन बंद करते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचे सर्वत्र वाढते रुग्ण व यामुळे मृत्यूंची वाढती संख्या लक्षात घेवून सर्वसामान्यांना जीवदान देणारा हा उपक्रम आॅक्सिजनवर आला आहे. सेलू येथे एनसीडी उपक्रमाअंतर्गत एकूण सहा जण या कार्यरत आहेत. एमबीबीएस दर्जाच्या वैद्यकीय अधिकारी मीना हिवलेकर या विभागाच्या प्रमुख आहेत.
तालुक्यातील वाढत्या रुग्णांमुळे हे युनिट नेहमीच गजबजून आहे. महिन्याकाठी येथे १ हजार २०० रुग्ण उपचार घेत आहे. सध्या वैद्यकीय अधिकारी व अधिनस्थ एका सहकाऱ्यांच्या भरवशावर हा एनसीडी उपक्रम सुरू आहे. त्यामुळे रुणांची गैरसोय होते. हा उपक्रम बंद होवू नये अशी मधुमेह व उच्च रक्तदाब त्रस्त रुग्णांची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)