राष्ट्रवादी काँग्रेस-बसपा युतीवर विचारमंथन

By admin | Published: January 28, 2017 01:11 AM2017-01-28T01:11:44+5:302017-01-28T01:11:44+5:30

काँग्रेससोबतची आघाडीची शक्यता मावळत असताना बहुजन समाज पार्टीसोबत हात मिळवणी करुन जिल्हा परिषद

NCP-BSP combine ideology | राष्ट्रवादी काँग्रेस-बसपा युतीवर विचारमंथन

राष्ट्रवादी काँग्रेस-बसपा युतीवर विचारमंथन

Next

चर्चा सकारात्मक : निर्णयाचा चेंडू बसपाश्रेष्ठींच्या कोर्टात
राजेश भोजेकर ल्ल वर्धा
काँग्रेससोबतची आघाडीची शक्यता मावळत असताना बहुजन समाज पार्टीसोबत हात मिळवणी करुन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या बोलणीला यश येत नसल्यामुळे नवा पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने बसपासोबत युतीबाबत बोलणी सुरू केलेली आहे. बसपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या युतीबाबत उत्साही आहे. मात्र बसपाने कुणाशीही युती न करता स्वबळावरच लढावे, असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह असल्यामुळे ही युती होईल किंवा नाही याबाबत साशंकताच आहे.
युती केल्यास काही जागांवर बसपाला हमखास यश मिळण्याची शक्यता आहे. हा पक्ष प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात आला आहे. मात्र काही मतांनी पक्षाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागत आहे. ही बाब हेरुन स्थानिक पातळीवर युती करण्यास वरिष्ठांनी हिरवी झेंडी दिल्यास पक्षाला सत्तेत सहभागी होता येणे कठीण नाही. या पद्धतीने बसपाचे स्थानिक पदाधिकारी पक्षश्रेष्ठींना पटवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवरुन अद्याप होकार आला नसल्याची माहिती आहे.
बसपाने उत्तर प्रदेशात सत्ता मिळविण्यासाठी अनेकदा अन्य पक्षांशी हातमिळवणी केली आहे. मग इतर राज्यातील कार्यकर्त्यांनाही आपण सत्तेत सहभागी होण्यासाठी युती करायला काय हरकत, असा प्रश्न पडला आहे. बसपाकडे कॅडर आहे. मात्र विजयाचा आकडा गाठता येणे जड जात आहे. विजयश्री खेचून आणायची असेल, तर युतीशिवाय पर्याय नाही, असा सूरही बसपा कार्यकर्त्यांत उमटत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार सुरेश देशमुख यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. एक पाऊल बसपालाही टाकायचे आहे. यासाठी परवानगीचा चेंडू बसपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात आहे. याकडे बसपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

बसपाने स्थानिक पातळीवर युती करुन निवडणुका लढल्यास पक्षाला हमखास यश मिळेल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीबाबतचा प्रस्ताव आलेला आहे. हा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. त्यांची हिरवी झेंडी मिळाल्यास युतीबाबतचा निर्णय होईल.
- मोहन राईकवार, जिल्हाध्यक्ष, बसपा, वर्धा.

Web Title: NCP-BSP combine ideology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.