स्वच्छ शहर अभियान नागरी चळवळ होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:06 PM2018-09-17T23:06:25+5:302018-09-17T23:06:55+5:30

स्वत:च्या घरापासून सुरूवात करून इतरांना सामील करण्याची वृत्ती बाळगली तर स्वच्छ शहराचे स्वप्न साकारले जावू शकते. एन.सी.सी. छात्र सैनिकांनी घरोघरी जावून जनजागृती करून स्वच्छ शहर अभियानात सहभागी करण्याची गरज आहे , असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

The need for a clean urban campaign to be a civil movement | स्वच्छ शहर अभियान नागरी चळवळ होण्याची गरज

स्वच्छ शहर अभियान नागरी चळवळ होण्याची गरज

Next
ठळक मुद्देरामदास तडस : एन.सी.सी. पथकाच्यावतीने अभियानाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : स्वत:च्या घरापासून सुरूवात करून इतरांना सामील करण्याची वृत्ती बाळगली तर स्वच्छ शहराचे स्वप्न साकारले जावू शकते. एन.सी.सी. छात्र सैनिकांनी घरोघरी जावून जनजागृती करून स्वच्छ शहर अभियानात सहभागी करण्याची गरज आहे , असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील एनसीसी पथक व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ अभियान उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सुचिता मडावी, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, एन.सी.सी. अधिकारी प्रा. मोहन गुजरकर, श्रीकांत भगत, प्रा. कुवारे, प्रा. जगदीश यावले उपस्थित होते.या अभियानाची सुरूवात छात्र सैनिकांनी न.प. समोरील बाजारपेठ स्वच्छ करून दुकानदारांना व व्यावसायिकांना सहभागी करवून घेतले. याप्रसंगी खासदार रामदास तडस यांनी एनसीसी छात्र सैनिकांना स्वच्छता अभियानाची शपथ दिली.
कार्यक्रमाचे संचालन अंडर आॅफिसर लोभास उघडे याने तर आभार कॅडेट स्वप्नील मडावी याने मानले. यावेळी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
खासदारांनी विद्यार्थी समवेत सालोड केले स्वच्छ
वर्धा- न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज वर्धा अंतर्गत समाजकार्य विभाग तथा सालोड (हि.) ग्रामस्थांच्यावतीने स्वच्छ भारत अभियान निमित्य स्वच्छता व जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाला खा. रामदास तडस, सरपंच मिलिंद देशमुख, जि.प. सदस्य बाबाराव वांदीले, आशिष कुचेवार आदी उपस्थित होते. त्यांनी गावातील परिसराची पाहणी करून स्वत: स्वच्छतेला सुरूवात केली. घमेले, पावडे घेत गाव स्वच्छ करण्याचा संकल्प करून कामाला सुरूवात केली. यावेळी सरपंच वंदना वांदीले, गुड्डू कावळे, हरिष तडस, सौरभ भुसारी,नेहरू विद्यालय सालोड मुख्याध्यापक वाके, आरोग्य सेवक वाल्मिक करंडे, समाजकार्य विभाग प्रमुख मनीष भोयर, सुष्मीता मोहड, गौरव काळमेघ, प्रशांत भुसारी, दिनेश करलुके, आचल लोखंडे, अंकित डेहने, श्रीकांत बाराहाते, चेतन पेटकर, रेणुका सावरकर, प्रगती आकरे, पायल राऊत व युवक उपस्थित२ होते.

Web Title: The need for a clean urban campaign to be a civil movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.