गरजू महिला व विद्यार्थ्यांना मिळणार अनुदानावर शिवणयंत्र व सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:24 PM2017-12-18T23:24:28+5:302017-12-18T23:24:53+5:30
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महिलांना शिवणयंत्र व विद्यार्थिनींना सायकल व संगणकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे,....
आॅनलाईन लोकमत
वर्धा : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महिलांना शिवणयंत्र व विद्यार्थिनींना सायकल व संगणकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सोनाली अशोक कलोडे यांनी दिली.
ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा हा दृष्टीकोण समोर ठवेून जिल्हा परिषदमार्फत ९० टक्के अनुदानावर शिवणयंत्र पुरविण्यात येते. सन २०१७-१८ मध्ये आठही पंचायत समिती अंतर्गत शिवणयंत्र वाटप केल्या जाणार आहे. एकूण २२६ शिवणयंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. वर्ग सातवी ते बारावी उत्तीर्ण मुलींना ९० टक्के अनुदानावर एकूण ७७६ विद्यार्थिनींना संगणकाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीकोणाने ९० टक्के अनुदानावर शिवणयंत्र पुरविण्यात येते. ग्रामीण भागातील मुलींना १०० टक्के अनुदानावर २२६ सायकली दिल्या जाणार आहे. याकरिता जि.प. व पं.स. सदस्य यांना लाभार्थ्यांची माहिती सादर करावयाची आहे.
त्यानुसार लाभार्थ्यांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर ही यादी तयार करण्याचे कार्य सुरू आहे. सन २०१६-१७ मध्ये आठही पंचायत समिती अंतर्गत ओ.बी.सी., एस.सी., एसटी प्रवर्गातील सुमारे ७७४ विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे. सोबतच २०१७-१८ मध्येही लाभार्थ्यांना सायकलीचे वितरण करण्यात येणार आहे.
सन २०१६-१७ मध्ये देवळी पं.स. अंतर्गत ११८, आर्वी ६६, कारंजा १७३, आष्टी ३७, सेलू १२४, वर्धा १०९, हिंगणघाट ८६, समुद्रपूर ६१ असे एकूण ७७४ लाभार्थी होते, अशी माहिती सोनाली कलोडे यांनी दिली. महिलांच्या विकासासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येवून त्याचा गरीब घरातील महिला व विद्यार्थिनींना लाभ देवून त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.