नवे शैक्षणिक धोरण नवा भारताचा पाया ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 05:00 AM2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:25+5:30

शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले की, आमचे शिक्षक हेच भारत गौरव पुढे घेऊन शकतात. वर्धा एक साधनेची धरती आहे. महात्मा गांधीजींनी सेवाग्राम येथे राहून आपले अनेक कार्यक्रम राबविले. सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश संपूर्ण जगाला देण्याचे काम त्यांनी केले. येथील विद्यार्थी गांधी योद्धा म्हणून जगात सत्य, अहिंसा, शांतता, आत्मीयता,सौहार्द आणि संस्कृती यांचे प्रसारक झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी ऑनलाईनच्या माध्यामातून व्यक्त केली.

A new educational policy will be the foundation of a new India | नवे शैक्षणिक धोरण नवा भारताचा पाया ठरेल

नवे शैक्षणिक धोरण नवा भारताचा पाया ठरेल

Next
ठळक मुद्देरमेश पोखरियाल : आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठात ऑनलाईन संकुलाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नवीन शैक्षणिक धोरण हे नव भारताच्या निर्मितीचा पाया ठरणार आहे. या धोरणामध्ये महात्मा गांधीजी यांच्या नई तालीमला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी साकेत संकुलाच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यादरम्यान केले.
हबीब तनवीर सभागृहात आयोजित ऑनलाईन लोकार्पण सोहळ्याला कुलगुरु प्रा. रजनीश कुमार शुक्ल, खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, प्रकुलगुरु प्रा. हनुमानप्रसाद शुक्ल, प्रा. चंद्रकांत रागीट, कुलसचिव कादर नवाज खान, नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे यांची उपस्थिती होती.
यावेळी ५६ निवासस्थान असलेल्या साकेत संकुलाचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. साहित्य विद्यापीठाच्या अधिष्ठाता प्रा. प्रिती सागर यांनी साकेत वैभव आणि बौद्ध ग्रंथ सुत्तपिटकमधील मज्झिम निकाय यांचे वाचन केले.
शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले की, आमचे शिक्षक हेच भारत गौरव पुढे घेऊन शकतात. वर्धा एक साधनेची धरती आहे. महात्मा गांधीजींनी सेवाग्राम येथे राहून आपले अनेक कार्यक्रम राबविले. सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश संपूर्ण जगाला देण्याचे काम त्यांनी केले. येथील विद्यार्थी गांधी योद्धा म्हणून जगात सत्य, अहिंसा, शांतता, आत्मीयता,सौहार्द आणि संस्कृती यांचे प्रसारक झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी ऑनलाईनच्या माध्यामातून व्यक्त केली.
कुलगुरु प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी हिंदी विश्वविद्यालय हिंदी माध्यमातून सर्व भारतीय भाषांमध्ये संशोधन आणि अनुवाद करण्यात महत्वाची भूमिका पार पाडेल, असे ते म्हणाले. यावेळी कोरोना संकटात वर्धा जिल्हा सुरक्षित असून त्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांचे कौतुकही करण्यात आले. येत्या पाच सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी वर्ध्यातून शिक्षण घेऊन विदेशात गेलेल्या विदेशी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती प्रा. शुक्ल यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला असून विश्वविद्यालयातील शिक्षक व विद्याथ्यांसह आदींसाठी यूट्यूब, चॅनलवर लोकार्पण कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. संचालन कुलसचिव कादर नवाज खान यांनी केले. आभार प्रकुलगुरु प्रा. हनुमान प्रसाद शुक्ल यांनी मानले.

Web Title: A new educational policy will be the foundation of a new India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.